Jitendra Awhad Latest Marathi News
Jitendra Awhad Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

'शरद पवार आमचा बाप, त्यांच्यासाठी मंत्रीपद गेलेतरी बेहत्तर'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर विखारी टीका करणारी कविता अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने शेअर केली होती. या कवितेत पवारांच्या आजारपणावरही टीका करण्यात आली. याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केतकी हिचा जोरदार समाचार घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही केतकीवर टीका केली. (Jitendra Awhad Latest News)

आव्हाड म्हणाले, शरद पवार साहेबांबाबत इतके चुकीचे लिहिले, ते वाचल्यानंतर पहिले डोळ्यात अश्रू येतात. की त्यांना नरक मिळावा, असे म्हणजे ही भाषा आणि ती पण एका स्त्रीच्या तोंडातून. तुम्हला वाटत असले की कायदा एकदम बोथट आहे. काही होत नाही, तर तसे नाही आहे. त्यामध्ये पाच-पाच वर्षाची सजा होऊ शकते. त्याचे पुरावे आहेत. मात्र, आमचे सरकार इतके गांभिर्याने घेत नाही, अशी खंत आव्हाड यांनी व्यक्त केली.

केतकीची पोस्ट ज्यांनी रिट्वीट केले आहे, ते सुद्धा गुन्हेगार ठरतात. कशालाही रिट्वीट करायचे नसते, असेही आव्हाड म्हणाले. त्याच बरोबर त्या कादंबरी कार सुनयना होळे, यांनी आता सावरावे स्वत:ला, असा इशारा आव्हाड यांनी दिला. कोणाला वाटत असेल ही धमकी आहे, आपले पद गेले तरी बेहत्तर पण साहेबांवरची टिका सहन करणार नाही. पद हे साहेबांपेक्षा मोठे नाही. त्यांना वाटत असेल हे पदाला घाबरतील आम्ही पदाला घाबरत नाही. बापापूढे कोण नाही, तेव्हा हे असे करू नका, ऐवढीच विनंती आहे. याचे परिनाम वाईट होतील, असा गंभीर इशारा आव्हाड यांनी दिला.

कोणाला अटक झाली हे माला माहित नाही. मात्र, केतकी चितळे कुठेही लपली तरी दिला शोधून काढता येईल. तुमचे फेसबूक अकाऊंट ट्रक करायला नवीन नवीन स्पॉटवेअर आले आहेत. त्या पाताळात जरी लपून बसल्या असल्या तरी सुद्धा शोधून काढता येईल. पण तुम्ही लिहिलेले आहे ना मग या समोर, बोललात ना तर मग खंबीरपणे उभे रहा. असे गल्लीबोळात शिरून उंदरासारखे पळून जाऊ नका, असेही आव्हाड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT