केतकी चितळेविरोधात दुसरा गुन्हा पुण्यात! कारवाई अटळ असल्याचे गृहमंंत्र्यांचे विधान

Ketaki Chitale | Sharad Pawar : यापूर्वी कळव्यात देखील केतकीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Ketaki Chitale | Dilip walse patil
Ketaki Chitale | Dilip walse patil Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्यावर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. ५००/ ५०१/१५३अ/५०५ २९५अ या कलमान्वये केतकी चितळेसह ही मुळ पोस्ट लिहील्याचा आरोप असलेल्या वकील नितीन भावे आणि निखील भामरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

केतकी चितळेवर यापूर्वी ठाण्यातील कळवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता नुसार कलम 500, 501, 505, 153-A अशा कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष/जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केतकीच्या पोस्टमुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तसेच दोन समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नेटके यांनी काल रात्री दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज सकाळी केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Ketaki Chitale | Dilip walse patil
केतकी चितळे विरोधात कळव्यात पहिला गुन्हा दाखल; पोलिस आजच ताब्यात घेण्याची शक्यता

दरम्यान, एकाच दिवसात दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली असून पोलिस तिला अटक करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच नांदेडमध्ये बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केतकी चितळेवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. ते म्हणाले, ही सर्व जाणूनबुजून आणि ठरवून केलेली गोष्ट आहे. यावर निश्चीतपणे कारवाई होईल.

Ketaki Chitale | Dilip walse patil
भंडारा जि.प. उपाध्यक्षांसह ३ सदस्य अडचणीत; अ‍ॅट्रॉसिटी अन् विनयभंगाचा गुन्हा दाखल

केतकी चितळे हिने काल (शुक्रवारी) फेसबूकवरुन एका पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीका केली. केतकी अनेकदा अशा पोस्ट करत असते. मात्र कालच्या पोस्टमध्ये तिने वापरलेल्या भाषेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचे चित्र आहे. या पोस्टच्या माध्यमतून टीका करताना तिने वापरलेल्या भाषेवरुन तिच्यावर टीका करण्यात येत असून ही भाषा अत्यंत खालच्या दर्जाची आणि गरळ ओकणारी असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com