Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : आव्हाडांनी शेअर केली "एका बाबाची गोष्ट.." ; पिता म्हणून हे सगळं सहन करायचं ?

सरकारनामा ब्युरो

Jitendra Awhad Emotional Post on facebook : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावईला जीवे मारण्याची धमकी देणारा एक ऑडिओ सध्या व्हायरल होत आहे. आव्हाडांनी त्याला माध्यमांसमोर दुजोरा दिला आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आव्हाडांच्या समर्थकांकडून ठाणे मनपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली होती. सध्या आहेर यांच्यावर उपचार सुरु आहे.

कथित ऑडिओमध्ये महेश आहेर यांनी बाबाजी नावाच्या शुटरला सुपारी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर जितेंद्र आव्हाड माध्यमांसमोर म्हणाले की, "तो स्वत:च्या तोंडाने कबूल करतो आहे. एक गोष्ट मी टीव्हीवर माझ्या कुटुंबियांबद्दल पाहिली की, माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असणार, असे तो क्लिपमध्ये बोलतो आहे.” या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी त्यांच्या फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

कुख्यात गुंड सुभाष सिंह ठाकूर उर्फ बाबाजी याला जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचे आदेश देत असल्याची एक ऑडिओ क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. यात ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या नावाचा उल्लेख होता. यानंतर महेश आहेर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर आव्हाड यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.

"तुम्हीच मला सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं. एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. आणि भूमिका काय घ्यायची ? घाबरुन घरी बसायचं, का उघडपणाने मैदानात यायचं,” असे आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फेसबूक पोस्टमध्ये आव्हाड म्हणतात..

ज्या नताशाला मी तीच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही. किंवा ओरडलोही नाही. तीच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डींग लावून मारुन टाकेन हे बोलतो. तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते.

तुम्हीच मला सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं. एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. आणि भूमिका काय घ्यायची ? घाबरुन घरी बसायचं, का उघडपणाने मैदानात यायचं.

कोण आहे बाबाजी ? बाबाजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे जे हत्या शुटआऊट मधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला.

त्याच्या हस्तकांकरवी जावयाचा आणि मुलीचा मर्डर होणार. हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटल असेल. राजकारण बाजूला ठेवा. पण, कधीतरी ह्या गोष्टीचा देखिल विचार करा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT