Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविषयीच्या एका पुस्तकातील दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. ईडीच्या कारवाईपासून सुटका व्हावी, यासाठी सरकारमध्ये सामील झाल्याचा दावा भुजबळांनी केल्याचे पुस्तकात म्हटले आहे. भुजबळांनी हे आरोप फेटाळले असले तरी आता महाविकास आघाडीने त्यावरून रान उठवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत भुजबळांचे आभार मानले आहेत. भुजबळ साहेब तुम्ही खरे बोललात, ह्या बद्दल आभार. बीजेपी जातीवादी आहे, हे बोलण्याची हिंमत तुम्हीच दाखवू शकता, असे आव्हाडांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
मीडियाशी बोलताना आव्हाडांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, भुजबळांच्या म्हणण्याला महाराष्ट्रात महत्व आहे. जात वर्चस्ववाद हा भाजपचा धर्म आहे. या देशातील 85 टक्के लोकांचा भाजपला राग आहे. त्यांना इतर कोणी नको आहे. हाच राग भुजबळांनी बोलून दाखवला. भुजबळांनी भाजपची मानसिकता जाहीर केली.
'द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया' या राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात ईडीपासून सुटका व्हावी, यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असं भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. मी ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचं भुजबळांनी सांगितल्याचेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
पुस्तकातील सर्व दावे भुजबळांनी शुक्रवारी फेटाळून लावले. मी अशी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. ईडीपासून सुटका करण्यासाठी तिकडे गेलो, हा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात उध्दव ठाकरे यांचे सरकार असतानाच मला कोर्टाने क्लीन चीट दिली आहे. ज्या 54 लोकांनी सह्या केल्या होत्या, त्या सगळ्यांवर ईडीची केस नव्हती. तिकडे गेल्यानंतर आम्ही मतदारसंघाचा विकास करू शकलो. लोकांना विकास व्हायला हवा. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये सामील झालो, असे भुजबळांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.