Nawab Malik News  Sarkarnama
मुंबई

Nawab Malik Bail: नवाब मलिक तुरुंगाबाहेर; कार्यकर्त्यांकडून 'ग्रँड वेलकम'

Nawab Malik Breaking News : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक दीड वर्षानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केल्यानंतर ते अखेर दीड वर्षानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मलिकांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनी लाँडरिंग प्रकरणी मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा, अशी याचिका मलिकांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने दोन महिन्यांसाठी त्यांना जामीन मंजूर केला आहे.

दीड वर्षानंतर नवाब मलिक सोमवारी तुरुंगाबाहेर आले असून यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. गेल्या वर्षभरापासून मलिक हे किडनीच्या आजाराने त्रस्त असून ते क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.

जामीन मंजूर झाल्यानंतर ते हॉस्पिटलमधून घरी जाणार असून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी केली होती. मलिक हे बाहेर आल्यानंतर थेट त्यांच्या घरी जाणार असून हॉस्पिटलबाहेर कार्यकर्त्यांनी मलिकांचे जोरदार स्वागत केले.

सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांना जामीन मंजूर करताना काही अटी देखील घातल्या आहेत. मलिकांचा पासपोर्ट ईडीकडे जमा करण्यात यावा, तसेच कुठल्याही माध्यमाशी संवाद साधू नये, या प्रकरणातील साक्षीदार व अधिकारी यांच्याशी मलिकांनी संपर्क ठेवायचा नाही, अशा अटी कोर्टाने घातल्या आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT