Maharashtra Politics: शरद पवार-अजितदादांच्या गुप्त खलबतांनंतर काँग्रेस 'अलर्ट'; महाराष्ट्रातील घडामोडींवर 'हायकमांड'चं लक्ष

Sharad Pawar-Ajit Pawar Meeting: शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीने राज्याचे राजकारण ढवळून निघाले
Rahul Gandhi and
Sonia Gandhi
Rahul Gandhi and Sonia GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. शनिवारी पुण्यात ही गुप्त भेट झाल्याची चर्चा असून याबाबत शरद पवारांनी खुलासाही केला. "अजित पवार हे माझे पुतणे असून कुटुंबातील व्यक्तीने भेटण्यात गैर काय?",अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, यानंतर ठाकरे गट आणि काँग्रेस 'अलर्ट' झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबत थेट राहुल गांधींशी चर्चा करत शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीची माहिती त्यांना दिली. यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर काँग्रेस हायकमांड देखील लक्ष ठेवून असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Rahul Gandhi and
Sonia Gandhi
Sanjay Raut On Sharad Pawar: पवारांची संभ्रमावस्था चिंताजनक; गुप्त भेटीच्या चर्चांवर संजय राऊतांचे मोठे विधान

"अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील गुप्त भेटीमुळे जनतेत संभ्रम असून अजित पवार त्यांचे नातेवाईक आहेत. पण गाडीत झोपून जाणे आणि गुप्तपणे बैठक घेणे हे आघाडीसाठी चिंताजनक आहे", असे नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. मुंबईत होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीत काँग्रेस हायकमांड आणि शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi and
Sonia Gandhi
Sharad Pawar News: अजित पवार माझे पुतणे, कुटुंबातील व्यक्तीने भेटण्यात गैर काय? गुप्त भेटीवर पवारांचा खुलासा

खासदार संजय राऊत यांनीही माध्यमांशी बोलताना अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील गुप्त भेटीसंदर्भात सूचक विधान करत "शरद पवार यांच्या भूमिकेबाबतचा संभ्रम फार काळ राहता कामा नये, यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काही निर्णय घेणे आवश्यक आहे", असे म्हटले होते.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com