Nawab Malik, Devendra Fadnavis
Nawab Malik, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

देवेंद्रजी, पंधरा कोटींच्या 'त्या' पार्ट्यांचा आयोजक कोण? मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ड्रग्ज कनेक्शनचे (Drugs Connection) गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी मंगळवारी पुन्हा निशाणा साधला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 15 कोटींच्या पार्ट्या होत होत्या. या हॉटेलमध्ये त्यांचा भाऊ काय करतो, हे त्यावेळी त्यांना सांगितले होते. त्यात ड्रग्जचा वापर होत होता, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे.

ड्रग्ज कनेक्शनच्या आरोपानंतर फडणवीस यांनी मलिकांना सोमवारी लगेचच प्रत्युत्तर दिले. याबाबत खुलासा करत फडणवीस यांनी जयदीप राणाबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच दिवाळीनंतर मलिकांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पुरावे सादर करणार असल्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला होता. त्यावर मलिकांनी मंगळवारी फडणवीस यांना प्रतिआव्हान देत नवा खुलासा केला आहे.

मलिक म्हणाले, देवेंद्रजी, पाच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता. गृह विभाग तुमच्याकडे होता. मी नेहमी त्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत होतो. मुंबईत नकली देवेंद्र कोण फिरत आहे, असा इशारा मी दिला होता. तुमचा भाऊ हॉटेलमध्ये काय करतो हे मी सांगितले होते. त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मी त्यावेळी जारी केले असते तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नसती. ते फुटेज मी आताही जारी करणार नाही, असा सूचक इशाराही मलिकांनी दिला.

त्या हॉटेलमध्ये सतत विविध पार्ट्यांचे आयोजन होत होते. त्या पार्ट्यांचे आयोजक कोण होते? एका टेबलची किंमत 15 लाख होती. रात्रभर पार्ट्या सुरू होत्या. 15-15 कोटींच्या पार्ट्यांच्या आयोजक कोण होते? सरकार बदल्यानंतर पार्टी बंद झाली. तुम्हाला हे माहित नव्हते का? या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील, असे म्हणत मलिकांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

मलिकांनी दिलं फडणवीसांना आव्हान

अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केलेल्या फडणवीसांनी मलिकांनी प्रतिआव्हान दिले आहे. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असे म्हणण्याची आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही. माझ्याकडे शीशमहल नाही. तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री होता. त्यावेळी तुम्हाला हे माहिती होते तर माझ्यावर कारवाई का केली नाही, असं आव्हान मलिकांनी फडणवीसांना दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT