वानखेडेंचा शर्ट 70 हजारांचा, एक लाखाची पँट तर बुट दोन लाखांचा!

वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी पुन्हा आरोप केले आहेत.
Sameer Wankhede
Sameer Wankhede

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी खळबळ उडवून दिली होती. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल पुढे आल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. आतापर्यंत वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर बोलणारे मलिक आता वानखेडे यांच्या शर्ट, पँटवरही बोलू लागले आहे.

मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप केले. वानखेडे यांनी कोट्यवधी रुपयांची वसूली केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महागड्या कोटची चर्चा आधी होती. पण वानखेडे हे मोदींच्या पुढचे निघाले. त्यांच्या शर्टची किंमत 70 हजार रुपये, पँटची किंमत एक लाखांची तर बुट दोन लाखांचे असते. ते वापरत असलेले घड्याळही काही लाखांचे आहे. ते दररोज नवीन कपडे घालत असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.

Sameer Wankhede
नीरव मोदीलाही टाकलं मागं; पठ्ठ्यानं केला पंधरा हजार कोटींचा घोटाळा

आपण प्रामाणिक अधिकारी असल्याचे ते सांगतात. मग एवढ्या प्रामाणिक अधिकाऱ्याकडे 5 ते 10 कोटी रुपयांची कपडे आले कुठून, प्राणामिक अधिकाऱ्यांची जीवनशैली अशी असते, असे सवालही मलिक यांनी उपस्थित केले. एका गुन्ह्याचा तपास चौदा महिन्यांपासून सुरू आहे. कोणताही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास 13-14 महिन्यांपासून का पूर्ण होत नाही. घाबरून कोणी बोलत नाही. या प्रकरणात बॉलीवू़डमधील अभिनेत्री, अभिनेत्यांची चौकशी करण्यात आली आहे. पण आजपर्यंत एकही अटक नाही, असे मलिक यांनी सांगितले.

मालदीव व दुबईमध्ये हजार कोटी रुपयांची वसुली झाल्याचा पुनर्रुच्चार मलिक यांनी केला. या प्रकरणांची चौकशी एनसीबीने करायला हवी. मुंबई पोलिसांकडून सुरू असलेली चौकशी काढण्यासाठी वानखेडे धावपळ करत आहेत. सत्यमेव जयते म्हणणाऱ्या वानखेडे यांनी उलट ही चौकशी होऊ द्यायला हवी, असंही मलिक म्हणाले.

Sameer Wankhede
ED चा दिवाळीतच धमाका : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

प्रभाकर साईल यांच्या म्हणण्यानुसार, आठ कोटी वानखेडेंना द्यायचे होते. आता सॅम डिसूजा पुढे आला असून तोही हे मान्य करत आहे. एनसीबीच्या कार्यालयात गोसावी काय करत होता. क्रूझवर गोसावी काय करत होता, असे सवाल मलिक यांनी केले. एनसीबीचे डीजी म्हणत होते की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच समुद्रात कारवाई करण्यात आली. 15 दिवसांपासून तयारी सुरू होती. पण हे पुर्णपणे खोटे प्रकरण उभे करण्यात आल्याचा आरोप मलिकांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com