मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सोमवारी निशाणा साधला आहे. पवारसाहेबांचे राजकारण संपले , असे फडणवीस बोलले होते त्यावेळी चमत्कार घडला होता. आताही ते टिका करत आहेत. फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्याला मलिक यांनी जोरदार दिले आहे. मलिक म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही शाळेत होतात, त्यावेळी १९८४ साली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती. तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.
लोकशाहीमध्ये अमृत पिऊन कुणी सत्तेत कायमचा बसत नाही. हे तुम्हाला कळायला हवे. राष्ट्रवादी काँग्रेसने पवारसाहेब पंतप्रधान होतील. असा कुठलाही दावा कधी केलेला नाही. उलट ते देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विरोधकांच्या एकीमुळे मोदी सरकार सत्तेतून खाली उतरले, असे मलिक म्हणाले.
काय म्हणाले होते फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचा पक्ष स्थापन झाल्यापासून त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पाहिले जाते. मात्र, त्यांचे आजवर दहाच्या वर खासदार निवडून आलेले नाहीत. तरी देखील ते पंतप्रधान पदाचे स्वप्न बघू शकतात स्वप्न बघायला काही हरकत नाही, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.