आश्चर्य आहे! सचिन सावंत धावले राऊतांच्या मदतीला...थेट शब्दकोशच दाखवला

राऊत यांच्या विरोधात दिल्ली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sachin Sawant, Sanjay Raut
Sachin Sawant, Sanjay RautSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी खुर्ची घेऊन जातानाचा शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र त्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले होते. या टीकेनंतर संजय राऊतांनी 'ही चू**** बंद करा' असे विधान करत भाजपला उत्तर दिले होते. याप्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रतही राऊत यांच्या त्या शब्दांवरून भाजपने जोरदार टीका केली आहे. मुंबईत महिला कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केली आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना भाजप नेते चू**** आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी दोनदा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर-देसाई यांनी ही तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ ए (१) व (४), ५०९, ५०४, ५०० नुसार सुयोग्य गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी त्यात केली आहे.

Sachin Sawant, Sanjay Raut
सोबतचा कार्यकर्ता पडला तरी ज्योतिरादित्य शिंदे धावतच राहिले! व्हिडीओ व्हायरल

दिल्लीत गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊत यांच्या मदतीला काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) धावून आले आहेत. त्यांनी ट्विट करून एक शब्दकोश दाखवला असून त्यात राऊतांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. 'आश्चर्य आहे! संजय राऊत यांच्यावर भाजपा महिलांनी गुन्हा दाखल केला, का तर त्यांनी एक शब्द वापरला! जरी सदर शब्दाचा वापर मी करत नाही तरी अज्ञानी भाजपाच्या प्रबोधनासाठी मराठी लेखक व शब्दकोशकार कै. श्रीपाद जोशी यांच्या १९५७ पासून प्रकाशित अभिनव शब्दकोशातील तोच शब्द व अर्थ देत आहे, असे नमूद करत सावंत यांनी शब्दकोशच दाखवला आहे.

राऊतांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ शब्दकोशामध्ये मुर्ख, बुध्दू असा सांगण्यात आलेला आहे. हा शब्दकोश दाखवत सावंतांनी राऊतांची जणू पाठराखणच केली आहे. तसेच भाजपला टोला लगावला आहे. त्यामुळे आता सावंत यांच्या या प्रत्युत्तरला भाजप कसं उत्तर देणार, हे औत्सुक्याचे आहे.

भाजप नेत्यांविरुद्ध (BJP leaders) अश्लील तसेच स्त्रियांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी शेरेबाजी (Abusive language) केल्याप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मुंबई भाजप महिला मोर्चातर्फे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine drive police station) तक्रार नोंदविण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com