Nawab Malik  Sarkarnama
मुंबई

Nawab Malik Breaking News : तुरुंगातून पाय निघताच मलिकांच्या चेहऱ्यावर झळकला पुन्हा 'तो'च कॉन्फिडन्स !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : 'तपासयंत्रणांचा 'धाक' ठेवून भल्याभल्या नेत्यांना 'जेरबंद' करणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाला इशारे, आव्हान देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक सोमवारी रात्री आठच्या ठोक्याला तुरुंगातून बाहेर आले. तब्बल दीड वर्षांनी जामिनावर सुटलेल्या मलिकांचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. मलिकांनी तुरूंगातून पाय काढताच कार्यकर्त्यांनी गराडा घातला आणि फटाके फुटले, बॅण्ड वाजला.

या साऱ्याच जल्लोषात मलिकांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स' भारीच होता. याआधी पहिल्यांदा ईडीच्या चौकशीसाठी जाताना मलिकांनी हात उंचावून लढण्याचे संकेत दिले होते. तेव्हाच्या मलिकांच्या त्या फोटोची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर तुरूंगातून बाहेर आलेल्या मलिकांच्या चेहऱ्यावर हास्य होते.

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व तत्कालीन मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ ला अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली होती. मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला होता. पण आता तब्बल दीड वर्षांनंतर मलिक हे तुरुंगाबाहेर आले आहेत. पण या वेळेस मलिकांच्या चेहऱ्यावर दीड वर्षांपूर्वीचा तोच 'कॉन्फिडन्स' झळकलेला पाहायला मिळाला.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केल्यानंतर सोमवारी रात्री ८ वाजता जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते तुरुंगाबाहेर आले आहेत. गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँड्रिंग प्रकरणी मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर मलिकांना ११ ऑगस्टला जामीन मंजूर झाला. मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला असून ते तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत.

नवाब मलिकांनी प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा, यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. या जामिनाची प्रक्रिया मुंबई सत्र न्यायालयात पूर्ण केल्यानंतर मलिकांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. मात्र, मलिक तुरुंगाबाहेर आले असले तरी त्यांना कोर्टाने घातलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडी(ED)नं छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहिमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर नवब मलिक अडचणीत आले होते. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रिपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT