Kishor Patil On Sanjay Raut : संजय राऊत उद्धव ठाकरेंची दिशाभूल करतात; कशी... ते किशोर पाटलांनी सांगितलं

Thackeray Group Vs Shinde Group : ठाकरे गटाने कधीही ग्रामीण नेत्याला प्रोत्साहन दिले नाही
Kishor Patil, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Kishor Patil, Uddhav Thackeray, Sanjay RautSarkarnama

Jalgaon News : शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटातील सर्व आमदार-खासदारांचा वेळोवेळी खरपूस समाचार घेताना दिसत आहेत. मात्र राऊतांमुळेच शिवसेना फुटली आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सत्ता सोडण्याची वेळ आल्याचेही शिंदे गटाकडून पलटवार केला जात आहे.

कुठेही न फिरता एका जागी बसून राऊत ठाकरेंची 'चॉकलेट' दाखवून दिशाभूल करतात, असा खोचक टोला पाचोराचे आमदार किशोर पाटलांनी लगावला आहे. राऊत आणि ठाकरेंवर केलेल्या बोचऱ्या टीकेमुळे ठाकरे गटाकडूनही पाटालांना प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

Kishor Patil, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Rohit Pawar Reply Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका राष्ट्रवादीच्या जिव्हारी ; रोहित पवारांचा जशास तसा पलटवार; म्हणाले...

खासदार राऊतांनी २०१९ मध्येच मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार होते, मात्र भाजपने विरोध केल्याचे सांगितले होते. यावर आमदार पाटील म्हणाले, "खासदार संजय राऊतांमुळेच सर्व बट्टयाबोळ झाला आहे. ते एका कॅबीनमध्ये बसतात उध्दव ठाकरेंना पंतप्रधान करून टाकतात. तेवढ्याच एका चॉकलेटवर उध्दव ठाकरेही राहतात हेच खरे दुर्दैव आहे. "

"राऊत कधीही दालनाच्या बाहेर पडत नाही, त्यांना मुंबईच्या पलीकडे ग्रामीण महाराष्ट्रच माहिती नाही. अजूनही त्यांना राज्यात कुठे काय चालले आहे हेच माहिती नाही. ठाकरेच्या आजूबाजूला चार डोकी आहेत ते त्यांना कधी मुख्यमंत्री करतात, तर कधी पंतप्रधान करतात. त्यांच्या भोवतीची ही चार डोकी त्यांची फसवणूक करीत आहेत. पक्षाची फसवणूक करतात", असाही टोला पाटलांनी राऊतांसह ठकारेंना लगावला आहे.

Kishor Patil, Uddhav Thackeray, Sanjay Raut
CM Shinde On Thackeray: निवडणूक आल्यावर काहीजण मराठी माणूस मुंबईबाहेर गेल्याची आवई उठवतात; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

ग्रामीण नेता पुढे येवू दिला नाही

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यावर टीका करताना पाटील म्हणाले, "माझा अनुभव असा की मुंबईतील या नेत्यांनी कधीही ग्रामीण नेतृत्वच पुढे येवू दिलेले नाही. या मुंबईच्या नेत्यांना मुंबईपलीकडे महाराष्ट्रच माहीत नाही. आजपर्यंत दाखवा की शिवसेनेच्या मुंबईतील नेत्याशिवाय ग्रामीण महाराष्ट्रातील एक नेता उदयास आला आणि तो ग्रामीण महाराष्ट्राची भूमिका मांडतोय, असे कुठेतरी ऐकले का? असा एक तरी नेता दाखवा शिवसेनेने ग्रामीण महाराष्ट्रातील नेता वर येवू दिला. ग्रामीण महाराष्ट्रातील नेता वरती जात असलेला दिसला की थांबविला ही परिस्थिती शिवसेना ठाकरे गटात आजही दिसून येते", असल्याच्या आरोपही आमदार किशोर पाटील यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com