Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. त्याप्रकरणी ते तुरुंगात आहेत. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर किडनीच्या विकारावरील उपचार सुरू आहेत.
नवाब मलिक यांच्या वैद्यकीय कारणास्तव दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजुने युक्तिवाद करण्यात आला. तर इडीने नवाब मलिक यांच्या जामीनाला विरोध दर्शवला.
नवाब मलिक यांना उपचारांची गरज असून त्यांना अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी मलिक यांच्या वकीलाने न्यायालयाकडे केली. त्यानंतर नवाब मलिक यांच्या जामीनावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला. त्यामुळे आता पुढील आठवड्यात मलिकांच्या जामीन अर्जाबाबत निकाल येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईतील कुर्ला या ठिकाणी गोवावाला कंपाऊंडमध्ये तीन एकरची जागा असून या जागेत त्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने फेब्रुवारी 2022 मध्ये अटक केली होती.
तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मलिक गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार की नाही? हे पुढील आठवड्यात न्यायालयाने आपला फैसला सुनावल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.