Modi @9 Maha Sampark Abhiyan : लोकं ७० वर्षांत चंद्रावर गेले, पण सांगोला अजूनही पाण्यासाठीच झगडतोय; प्रशांत परिचारकांचा रोख कुणाकडे?

मोदींनी ४९ कोटी लोकांना जनधन खाते उघडण्यास प्रवृत्त करून विरोधकांच्या दलालांची साखळी मोडीत काढली आहे.
BJP Sabha
BJP SabhaSarkarnama

Sangola BJP Sabha : गेली ७० वर्षे सांगोला तालुका पाण्यासाठी संघर्ष करत आहे. सत्तर वर्षांत लोकं चंद्रावर गेली, तरी अजूनही सांगोला तालुका पाण्यासाठी झगडत आहे, हे तालुक्याचे दुर्दैव आहे, अशी टीका माढा लोकसभा मतदारसंघ प्रमुख तथा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली. त्यांचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा मात्र कार्यक्रमस्थळी रंगली होती. (Sangola has been fighting for water for the past 70 years: Prashant Paricharak)

मोदी @९ महासंपर्क अभियानांतर्गत सांगोल्यात (Sangola) भाजपच्या (BJP) वतीने संयुक्त मोर्चा संमेलन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार परिचारक (Prashant Paricharak) बोलत होते. ते म्हणाले की, मोदींनी ४९ कोटी लोकांना जनधन खाते उघडण्यास प्रवृत्त करून विरोधकांच्या दलालांची साखळी मोडीत काढली आहे.

BJP Sabha
Dharmraj Kadadi On Chimney : चिमणी वाचविण्यासाठी गेलेल्या काडादींना मुख्यमंत्री म्हणाले,‘ माझे हात बांधले गेले आहेत...’

बारा कोटी कुटुंबांना शौचालय, ९.५ कोटी कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन, ३.५ कोटी कुटुंबांना पीएम आवास योजना, ४१ कोटी तरुणांना मुद्रा योजनेतून २३ लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा, ४.५ कोटी लोकांना आरोग्य मदत, १२ कोटी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये पेन्शन, ८० कोटी लोकांना मोफत रेशन, १२ कोटी घरापर्यंत हर घर जल योजना, २२० कोटी कोरोना लसीकरण डोस, ८० कोटी लोकांना आयुष्यमान योजना, १ लाख ४४ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती, यासाठी २० लाख कोटी रुपये खर्च झाला असून सोलापूर जिल्ह्याला मिळाले ३० हजार रुपये मिळाले आहेत,असा दावाही परिचारक यांनी केला.

BJP Sabha
Nashik News : नाशिकच्या शिक्षण विभागात पुन्हा लाचखोर पकडला...येवल्यात लिपिक जाळ्यात!

देशात ९९२ मेडिकल कॉलेजची उभारणी, १४६२ विद्यापीठे उभारली आहेत. गेल्या ७० वर्षापासून गरिबी हटाव ही योजना मी ऐकत आहे. मात्र, गरिबी हटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. राम मंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा यासाठी मोदींचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने ओबीसी समाजाला दहा लाख घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत खासदार फंडातून हायमास्ट, सभामंडप, बाजार कट्टा, रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वेळापूर ते सांगोला रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. नीरा देवघर धरणातून दोन टीएमसी पाणी मंजूर झाले आहे. पुढील वर्षापासून माण नदीवरील बंधारे भरून दिले जाणार आहे. यापुढील लोकसभा निवडणुका पाणीप्रश्नांवर होणार नाहीत, असेही खासदारांनी ठासून सांगितले.

BJP Sabha
Thackeray Group Reaction : कर्नाटक सरकारने सावरकर, हेडगेवार यांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळले; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

या वेळी संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, संभाजी आलदर, शिवाजीराव गायकवाड यांची भाषणे झाली. या वेळी जयकुमार शिंदे, राजकुमार पाटील, माऊली हळवणकर, करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, तानाजी वाघमोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, गजानन भाकरे, शशिकांत देशमुख, विजय बाबर, डॉ. परेश खंडागळे, सिध्देश्वर गाडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com