Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

दिल्लीप्रमाणे राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न : पवारांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आता काही जणांकडून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण दिल्लीमध्ये काय झाले हे पाहिले आहे. राज्यात कुणाला सभा घ्यायची असेल तर सरकार परवानगी देईल. पण भाईचारा संपेल अशी वक्तव्य करणे ठिक नाही. मात्र, अशी कामे काही राजकीय नेते करत आहेत. पोलिसांविरोधात आरोप केले जात आहेत. मात्र, मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील जनता ज्या पद्धतीने कुणी माहोल खराब करण्याचा प्रयत्न करत आहे त्यास हिंदू-मुस्लिम सर्व मिळून भाईचारा तयार करतील, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला. ते मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आयोजित इफ्तार पार्टीमध्ये बोलत होते.

जगावर दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने रोजाचा उत्सव व लग्न समारंभही साजरे करायला मिळाले नाही. आज कोरोना समस्या कमी झाल्याने इफ्तार पार्टीच्या माध्यमातून रोजा इफ्तार स्वीकारला. आज मला आनंद आहे. देशाची राजधानी दिल्लीत एकप्रकारचे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिथे सरकार असले तरी तेथील कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे. दिल्लीत हल्ले झाले. देशातील वातावरण बिघडवण्याचे काम झाले आहे. आपसातील भाईचारा कमी करण्याचे वक्तव्य केले जात आहेत. हे योग्य नसून देशाचा माहोल खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील जनता हिंदू, मुस्लिम वा ख्रिश्चन यांनी भाईचारा टिकवण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्याकडून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याबद्दल आपले धन्यवाद, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

1 मे ला मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेबाबतही पवार यांनी अप्रत्यक्ष वक्तव्य केले. ते म्हणाले की, आता काहीजण देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणाला सभा घ्यायची असेल तर सरकार परवानगी देईल, पण भाईचार संपेल अशी वक्तव्य करणे ठिक नाही. मात्र, अशी कामे काही राजकीय नेत्याकडून केली जात आहे. दिल्लीत असाच प्रकार घडला असून तेथील लोकांची घरेही पाडण्यात आली आहे. अशीच परिस्थिती आपल्या राज्यांतही तयार करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. मात्र, राज्यातील हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चनांनी भाईचारा टिकवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT