Jitendra Awhad, Raj Thackeray, Jayant Patil
Jitendra Awhad, Raj Thackeray, Jayant Patil sarkarnama
मुंबई

'माझा चेहरा नागासारखा दिसतो; तर तुमचा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा दिसतो?'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ठाण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यावरुन आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरे यांचा समाचार घेतला.

राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा चेहरा नागासारखा दिसतो, असा टोला लगावला होता. त्यावर आव्हाड म्हणाले, ''स्टॅंड अप कॅामेडियनच्या जागा खाली आहेत. त्या जागा यांनी घ्याव्यात, माझा चेहरा नागासारखा दिसतो मला अभिमान आहे. तर तुमचा चेहरा हा कोंबडीच्या कुठल्या भागा सारखा दिसतो हे बघा'', अशा शब्दांत आव्हाड यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्याच बरोबर आव्हाड बुधवारी प्रत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत.

राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये पाटील म्हणाले, ''२०१४ ला नरेंद्र मोदींना पाठींबा, २०१९ ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर, वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, पुतण्या बाळासाहेब ठाकरे यांचा, मात्र नाते बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी. वारंवार रंगरूप बदलणारे, व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला.

राज ठाकरे यांनी आज (ता. १२) ठाण्यात मनसेची सभा घेतली. त्या सभेमध्ये त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते, जयंत पाटील यांचा उल्लेख 'जंत' पाटील असा केला होता. माझे भाषण निट ऐका, उत्तर प्रदेशमध्ये विकास झाला असेल तर आनंद आहे, असे मी म्हणालो होतो. पाटील यांना काही सांगा, त्यांची मिमिक्री करत, सतत आश्चर्य झाले असा चेहरा असतो, असे ठाकरे म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT