ठाणे : ‘‘येत्या ३ मे रोजी रमजान ईद आहे. माझी राज्य सरकार आणि गृह खात्याला विनंती आहे. आम्हाला कुठचीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही, महाराष्ट्राचं स्वास्थ बिघडवायचं नाही. आज १२ तारीख आज आहे. ता. १२ एप्रिलपासून ३ मेपर्यंत सगळ्या मस्जिदीच्या मौलावींशी बोलून घ्या, सर्व मस्जिदीवरील भोंगे उतरवायला सांगा. आमच्याकडून तीन तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही,’’ असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला भोंग्याबाबत नवी डेडलाईन दिली. (Remove loudspeakers from mosques till Ramadan Eid : Raj Thackeray)
मुंबईतील गुढी पाडव्याच्या सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांच्या सभेचे आज (ता. १२ एप्रिल) ठाण्यात आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. या मस्जिदींच्या भोंग्याचा अख्ख्या देशाला त्रास होतोय, यात धार्मिक तेढ कुठे आहे? तुम्हाला अजान पडायची आहे, तर त्यांनी ती घरात पडावी. शहरातली रस्ते फूटपाथ कशाला अडवता? प्रार्थना तुमची आहे, ती आम्हाला कशाला ऐकवता? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मस्जिदीबाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच.
आम्ही वातावरण बिघडवत नाही आहोत. हा धार्मिक नाही, तर सामाजिक विषय आहे. वयस्क, वृद्ध, विद्यार्थी सगळ्यांना याचा त्रास होतो. पाच वेळा बांग देता, एकतर सगळे बेसूर असतात. आम्ही ते का ऐकायचं. रस्त्यावर घाण झाली तर आपण रस्ते साफ करतो. मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवायलाच पाहिजेत. राज्य सरकारला माझं सांगणे आहे, आम्ही यापासून मागे हटणार नाही, काय करायचं आहे ते करा. या गोष्टीचा एकदाचा सोक्षमोक्ष लावू. ज्या देशात बंदी आहे, तिथे निमूटपणे ऐकत ना. माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत, तेही बोलतात, तुम्ही करताय ते योग्य आहे, असे राज यांनी नमूद केले.
आज तुमचा रमजान सुरू आहे, आम्ही समजू शकतो. आमचेही सण असतात, दहा दिवसांत लाऊडस्पीकर समजू शकतो, त्यावेळीही लाउडस्पीकरचा आवाज कमीच असला पाहिजे. सणवार असेल तर समजू शकतो; पण ३६५ दिवस ऐकवताय, ते कशासाठी कोणासाठी, असा सवाल त्यांनी मस्जिदींवरील भोंग्यासंदर्भात उपस्थित केला.
न्यायालयाची १८ जुलै २००५ चा टिपणी आहे. इतरांना त्रास होईल, अशी तुमची प्रार्थना करा, असा कुठला ही समाज, धर्म सांगत नाही. त्रास होईल इतरांना अश्या गोष्टीला परवानगी देता कामा नये. सर्वोच्च न्यायालय जर असा निर्णय देत असेल, तर सरकार त्याकडे का दुर्लक्ष करतंय, मतांसाठी का? हा देशभर त्रास आहे. माझं जे भाषण ऐकत असतील, तर हिंदूंना माझं सांगणे आहे, देभरात ३ तारखेपर्यंत मस्जिदीबाहेर भोंगे लावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.