Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

NCP MLA's will Meets Ajit Pawar: राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांच्या भेटीला; प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा होणार..?

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली होती. त्यानंतर याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागणी केल्यानंतर बरेच दिवस उलटून गेलेत. त्यानंतर आज अजित पवार यांची भेटीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा करणार असल्याचेही सांगितले जात आहे. आमदार किरण लम्हाटे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ अमोल कोल्हे, खासदार दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यादेखील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा मेळाव्यात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली होती. "नव्या चेहऱ्यांना आपण संधी दिली पाहिजे. इतकी वर्ष काम केले. मला सगळ्यांना सांगायचे आहे, मला विरोधी पक्ष नेते पदावर इच्छा नव्हती. मात्र, सगळे आमदार बोलले तुम्ही व्हा म्हणून जबाबदारी घेतली. कोणी म्हणते मी कडक वागत नाही. मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा, पक्षातील जबाबदारी द्या. संघटनेत कोणतेही पद द्या, त्या पदाला मी न्याय असा शब्द देतो, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या होत्या.

त्यानंतर ज्येष्ठ आमदार छगन भूजबळ (Chagan Bhujbal) यांनी प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी नेत्यांना देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण अजित पवार यांना प्रदेशध्यक्षपद आणि जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते पद दिलं तरी पक्षातील सर्व महत्वाची पदं ही मराठा नेत्यांच्या हाती जातील. यामुळे जातीय समतोल साधला जाणार नाही. यासाठीच भुजबळ यांनी थेट ओबीसी नेत्याकडे प्रदेशाध्यक्ष पद देण्याची मागणी केली, असं राजकीय तज्ञांची मत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT