NCP Crisis News Sarkarnama
मुंबई

Ncp Mlas Disqualification : राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणात मोठी माहिती समोर; राजकीय घडामोडींना वेग येणार

Mla Disqualification Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट...

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव-

Mla Disqualification Case Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्र आमदारांच्या सुनावणी प्रकरणात एक महत्त्वाची माहिती सामोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे गुरुवारी सुनावणी घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार, खासदारांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजप सोबत सत्तेत सहभागी झाले. जशी परिस्थिती शिवसेनेत झाली, तीच परिस्थिती राष्ट्रवादीत निर्माण झाली. ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्या विरोधात कोर्टात अपात्रतेची याचिका दाखल केली गेली. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्ष अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतील. निकालाला उशीर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश दिले होते. त्यानुसार या गुरुवारी राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाला आधी राष्ट्रवादी अपात्र आमदारांची सुनावणी होणार आहे. 10 तारखेला शिवसेना आमदारांची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या गुरुवारी अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

अजित पवार यांनी जून महिन्यात काही आमदारांसह शपथ घेतली आणि पक्षात बंडखोरी केली. जितेंद्र आव्हाड यांनी आमदार अपात्र करण्याची याचिका दाखल केली. विधानसभा अध्यक्षांनी निकाल लवकरात लवकर द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. विधानसभा अध्यक्षांसमोर आता दोन पक्षांच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केले आणि गुवाहाटीला गेले. त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. शिवसेना आमदारांची सुनावणी पूर्ण झाली आहे. केवळ आता निकालाची प्रतीक्षा आहे. येत्या 10 तारखेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदार अपात्रते संदर्भात निकाल देणार आहेत.

या निकालाचा परिणाम राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरही होण्याची शक्यता आहे. ज्या प्रमाणे शिवसेनेच्या आमदारांची साक्ष घेतली गेली, त्याच प्रमाणे राष्ट्रवादीच्या आमदारांचीही साक्ष घेतली जाणार आहे. त्यानंतर जो काही निकाल आहे तो निकाल 31 तारखेपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT