Mumbai : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज (शनिवारी) सुनावणी होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपल्याला वेळापत्रकात बदल करावा लागेल, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आता मंगळवारपासून (ता. 23) या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभाध्यक्षांसमोर सुनावणीसाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून जयंत पाटील उपस्थित होते, तर अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार होती. त्यामुळे या सुनावणीकडे दोन्ही गटांचे लक्ष लागले होते. मात्र आता ही सुनावणी मंगळवारपासून सुरू होईल. या सुनावणीला अॅड. डॉ. अभिषेक मनू सिंघवी आणि अॅड. कपिल सिब्बल शरद पवार गटाची बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
विधानसभाध्यक्षांकडे अजित पवार गटाकडून तीन दिवसांचा वेळ मागून घेण्यात आला आहे. त्यामुळे तीन दिवसांचा वेळ हा फायनल सबमिशनसाठी मिळणार आहे. दरम्यान, दोन्ही गटांमधील धाकधूकही वाढली आहे. शिवसेनाप्रकरणी विधानसभाध्यक्षांनी जो निकाल दिला त्याप्रमाणे विधिमंडळातील बहुमत हे अजित पवार गटाकडे असल्याचा दावा अजित पवार गटातील नेते करीत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणूक आयोगात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी अजून निकाल दिलेला नाही. निवडणूक आयोग याप्रकरणी काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, विधानसभाध्यक्षांसमोर सुनावणीत दोन्ही गटांकडून पक्षावर आपलाच दावा असल्याचे पुरावे सादर करण्यात येतील.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.