Manoj Jarange March to Mumbai : मनोज जरांगेंची नगरमध्ये तोफ धडाडणार; दीडशे एकरांवर 25 लाख आंदोलक मुक्कामी

Ahmednagar Maratha Protester : नगरमधील संवेदनशील भागात पोलिसांची करडी नजर
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Marathi News : मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे पदयात्रेने निघत आहे. या पदयात्रेत सुमारे 25 लाख आंदोलक सहभागी असणार आहेत. या पदयात्रेचा मुक्काम रविवारी (ता. 21) बाराबाभळी (ता. नगर) येथील दीडशे एकर मैदानावर असणार आहे. या मैदानाची, तसेच पदयात्रेच्या मार्गाची पाहणी मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. सुरक्षेत कोणतीही उणीव राहू नये, यासाठी पोलिसांकडून सर्व उपाययोजना करण्यात येत आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि आंदोलकांची शनिवारी अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणासाठी पदयात्रेला सुरुवात करीत आहे. या पदयात्रेपूर्वी जरांगे काहीसे भावूक झाले. मराठा समाजाची ही पदयात्रा पाथर्डीतून नगर तालुक्यात दाखल होणार आहे. बाराबाभळी येथे रविवारी रात्री मुक्काम करणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता जरांगे यांची सभा होणार आहे. या सभेची तयारी सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. या पदयात्रेत 25 लाख मराठा बांधवांचा समावेश असणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी दीडशे एकरांवर स्वच्छता आणि सपाटीकरण करण्यात येत आहे.

Manoj Jarange
Maratha Aarakshan Mumbai Morcha : बाजरीची भाकरी, ठेचा अन् चटणी; मराठा आंदोलकासाठी खास न्याहारी

बाराबाभळी येथे मनोज जरांगे यांचा मुक्काम यशस्वी व्हावा, यासाठी हजारो स्वयंसेवक कार्यरत आहेत. मुक्कामी पिण्याचे पाणी, तसेच जेवण्यासाठी फूड पॅकेज जमा करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातील फूड पॅकेज गोळा केले जाणार आहे. नगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 14 तालुक्यातून प्रत्येक एक लाख फूड पॅकेज गोळा करण्यात येईल, असे संयोजकाकडून सांगण्यात आले. मुक्कामाच्या ठिकाणी पुलाव आणि शिरा तयार केला जाणार आहे. पाण्याची सोय करण्यात आली आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange March to Mumbai : सरकारच्या दारात मरण आले तरी बेहत्तर; आजपासूनच उपोषणाची मनोज जरांगेंची घोषणा

पिण्याच्या पाण्यासाठी सीलबंद 14 लाख बाटली पॅकेज गोळा करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी 110 टँकरची सोय करण्यात आली. या पदयात्रेत सहभागी झालेल्या आंदोलकांवर औषधोपचारासाठी नगर शहरातील डॉक्टर पुढे आले आहे. तसेच नगर मेडिकल असोसिएशनकडून औषधे पुरवली जाणार आहे. मुक्कामस्थळी 25 बेडचे फिरते रुग्णालय राहणार आहे.

मुक्कामानंतर सोमवारी ही पदयात्रा नगर-पुणे रोडने पुढे जाईल. भिंगार, जीपीओ चौक, माळीवाडा बसस्थानक, सक्कर चौक, कायनेटिक चौक, केडगाव, सुपा, शिरूर, शिक्रपूर, वाघोली, पुणे या मार्गाने पुढे मुंबईकडे रवाना होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संवेदनशील भागातील हालचालींवर लक्ष

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे हे पायी मुंबईकडे निघत आहे. जरांगेंच्या घोषणेनंतर राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. नगरमधून ही पदयात्रा जात आहे. नगर शहर हे संवेदनशील आहे. त्यामुळे पोलिस संवेदनशील भागातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. पदयात्रा ज्या मार्गाने जाणार आहे, तेथील प्रत्येक चौकात बंदोबस्त राहणार आहे. मुंबई पोलिसही नगरमध्ये तळ ठोकून आहेत. मुक्कामस्थळाची आणि पदयात्रेची पाहणी करत आहेत. भिंगार, जीपीओ आणि कायनेटिक चौकात बंदोबस्त जास्त राहणार आहे. काही ठिकाणी ड्रोनद्वारे चित्रीकरणाचीही करणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com