Jitendra Awhad, Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : आव्हाडांनी काल रोहित पवारांना फटकारले अन् आज 'ईडी'च्या रेडनंतर म्हणाले, हे त्याचं फळ आहे...

Rohit Pawar : रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीची छापेमारी...

Rajanand More

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या श्रीरामांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आव्हाडांनी काल रोहित हे लहान असल्याचे म्हणत फटकारले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) छापेमारी सुरू असल्याचे समजते. त्यावर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आव्हाडांनी ईडीच्या छापेमारीवरून (ED Raid) ट्विट करत रोहित पवारांची (Rohit Pawar) पाठराखण केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो (Baramati Agro) कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याचे हे फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच "घरभेदी" सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल, असे आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, बारामती ॲग्रो कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीची कारवाई सुरू असल्याचे समजते. यापुर्वीही रोहित पवारांच्या कारखान्याशी संबंधित एका प्रकरणात साखर आयुक्तांकडून कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. तर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडूनही कारवाई करण्यात आली होती. आता ईडीची छापेमारी सुरू असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याचे मानले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहित पवारांचे ट्विट चर्चेत...

दरम्यान, एकीकडे ईडीची छापेमारी सुरू असताना रोहित पवारानी सूचक ट्विट केले आहे. ‘हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा... ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला... अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT