Maratha Reservation Survey : बीडमधील खुल्या प्रवर्गातील पावणेतीन लाख कुटुंबाचे होणार सर्वेक्षण

Beed Survey : बीड जिल्ह्यात १३ हजारांवर कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, मराठा जात अशा नोंदी आढळल्या आहेत.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama

Beed News : महाराष्ट्र सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील मराठा समाज आणि सर्वच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. त्यासाठी ३ हजार ४७९ प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. (Maratha Reservation : Survey of 2.75 lakh open category families in Beed will be conducted)

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे या जिल्हा स्तरावर नोडर ऑफीसर असून सहायक नोडल ऑफीसर म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी असतील. तालुका स्तरावर तहसीलदार आणि शहरी भागात नगरपालिका व नगर पंचायतींचे मुख्याधिकारी नोडल ऑफीसर असतील. यासाठी दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना पुणे येथे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation
Maratha Reservation : 'इम्पेरिकल डाटा’ सर्वेक्षणासाठी 22 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण केले होते. त्यानंतर सरकारने निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करून जिल्हा स्तरावर विविध जुन्या दस्तऐवजांतून कुणबी नोंदी शोधल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात १३ हजारांवर कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, मराठा जात अशा नोंदी आढळल्या आहेत.

दरम्यान, आता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाजासह सर्वच खुल्या समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाचे काम पंधरवाड्यात पूर्ण करावयाचे असले तरी अद्याप याचे प्रशिक्षण झालेले नाही.

Maratha Reservation
Shivsena News : काय हा योगायोग... दानवेंच्या मुलाच्या लग्नात शिंदे-ठाकरे एकत्र येणार?

दरम्यान, या सर्वेक्षणात मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील एका कुटुंबाची १५० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती घेऊन ती माहिती ॲपवर ऑनलाईन नोंदली जाणार आहे. जिल्ह्यातील ३४७९ तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांची प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, १५० प्रश्नांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार असले तरी यातील प्रश्न नेमके काय, याकडे मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचे लक्ष लागले आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation : मनोज जरांगे- पाटलांच्या आंदोलनासाठी मुंबईत 'या' तीन मैदानांची पाहणी

दरम्यान, बीड जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येत मराठा समाजासह खुल्या प्रगर्वाची लोकसंख्या १३ लाख ६६ हजार ६४७ एवढी आहे. एका कुटूंबात साधारण पाच व्यक्ती गृहीत धरल्या तर खुल्या प्रवर्गाचे कुटुंब दोन लाख ७३ हजार ३२९ एवढी आहे.

Edited By : Vijay Dudhale

Maratha Reservation
Sanjay Raut News : महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात...! खासदार संजय राऊत यांचे स्पष्टीकरण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com