Ekanth Shinde  sarkarnama
मुंबई

Sanjay Shirsat : नरहरी झिरवळांची मंत्रालयाच्या जाळीवर उडी, मुख्यमंत्र्यांचा शिलेदार म्हणाले, 'फक्त बातमी होईल...'

Sanjay Shirsat On Narhari Zirwal jump from mantralaya building Sanjay Shirsat : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत.

Roshan More

Sanjay Shirsat News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर आणि धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षणाला विरोधासाठी नरहरी झिरवाळ यांच्यासह काही आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. झिरवळांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय शिरसाट म्हणाले, 'झिरवळसाहेब हे मोठ्या पक्षाचे नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीपासून कोणी रोखू शकत नाही. पण आंदोलन करून बातमी होऊ शकते पण निर्णय होऊ शकतो का? हे पाहणं महत्त्वाचे असते'

झिरवळसाहेब हे घटनात्मकपदावर आहेत. ते विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी पदावर असताना असे आंदोलन करणे योग्य नसल्याचे देखील संजय शिरसाट म्हणाले. पदावरील व्यक्तीने असू करू नये, असे देखील शिरसाट यांनी ठासून सांगितले.

मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्यानंतर मंत्रालयातच सर्वपक्षीय आमदारांनी ठिय्या आंदोलन केले. नरहरी झिरवळ यांच्यासोबत आमदार राजेश पाटील, आमदार सुनील भुसारा, भाजप खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या घेतल्या.

झिरवळांच्या मानेला दुखापत

नरहरी झिरवळ हे यांच्यासह आमदारांनी मंत्रायातील जाळीवर उडी घेतल्याने पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. यावेळी झिरवळ यांचा बीपी वाढला होता. ते आंदोलन करताना त्यांच्या भोवती डाॅक्टरांचे पथक देखील होते. नरहरी झिरवळ यांच्या मानेला देखील दुखापत झाल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT