मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे.
"आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील, असे विधान शरद पवार यांनी केलं. यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, त्याला आम्ही पाठींबा देऊ," असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
"सत्ताधारी आणि विरोधक यांचा हा डाव आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे. "कोणी काय मागणी केली आहे, यापेक्षा ५० टक्क्यांत ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षणात घ्यावे. त्यानंतर आरक्षण 100 नाहीतर 150 टक्के पाठवायचे ते वाढवा.पण मराठा समाज हा 50 टक्के ओबीसी आरक्षणात आला पाहिजे," असे मनोज जरांगे म्हणाले.
अगोदर मराठा समाजाला ओबीसींच्या आरक्षणात घ्या, नंतर आरक्षणाची मर्यादा वाढवा, असे जरांगे म्हणाले. "कुठेतरी मराठा समाजाची दिशाभूल करायची, त्यांचा आशा-अपेक्षा वाढवायच्या, त्यापेक्षा अगोदर त्यांना आरक्षण द्या नंतर मर्यादा वाढवा,"
"विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांनी या नवीन डाव टाकला आहे. आमच्यासोबत बैठका झाल्या तेव्हा आरक्षण वाढविण्याबाबतचा मुद्या का काढला नाही," असा सवाल, मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या वेळी आता हा मुद्या काढला, सत्ताधारी आणि विरोधक यांना फक्त मराठा समाजाला खेळवत ठरवायचं आहे, असा आरोप जरांगे यांनी केले.
शरद पवार म्हणाले, सध्या 50 टक्क्यांच्यावर जाता येत नाही. आरक्षण हवे असेल तर 50 टक्क्यांच्यावर जावे लागेल. पार्लमेंटमध्ये कायदा दुरुस्ती करावी लागेल.75 टक्क्यांपर्यंत मर्यादा वाढवता येईल. तमिळनाडूत 78 टक्क्यांपर्यंत आरक्षण आहे. तमिळनाडून शक्य झालंय ते महाराष्ट्रात का शक्य होणार नाही,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.