Eknath Khadse-Ram Shinde Sarkarnama
मुंबई

राष्ट्रवादीचे आमदार जेथे मुक्कामाला तेथेच राम शिंदेंनी लावली फिल्डींग

विधानपरिषद निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) हे भाजपचे उमेदवार आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्याच्या विधानपरिषदेतील रिक्त जागांची निवडणूक उद्या ( सोमवारी ) होणार आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडी व भाजपचे सर्व आमदार सध्या मुंबईत वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये आहेत. या निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) हे भाजपचे उमेदवार आहेत. भाजपचे सर्व आमदार ताज हॉटेलमध्ये आहेत. मात्र या हॉटेलात राम शिंदे न थांबता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार थांबले असलेल्या हॉटेलात मुक्कामी गेले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ( NCP MLA Ram Shinde fielded at the place where he stayed )

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ट्रायडण्ट हॉटेलात मुक्कामी आहेत. त्याच हॉटेलात राम शिंदेही थांबले आहेत. तेथे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गाठीभेटी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट झाली का? त्यांच्याशी काय चर्चा केली या संदर्भात राम शिंदेंना विचारला असता त्यांनी सांगितले की, "ते सांगायचं नसतं. उद्याचा विजय आमचा आहे," असे म्हणत त्यांनी स्मित हास्य केले.

राम शिंदे यांच्या विजया बाबत भाजप कार्यकर्त्यांत विश्वास दिसत आहे. कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे हे विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांत आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारी (ता. 22) राम शिंदे यांच्या जल्लोषात स्वागताची तयारी सुरू केली आहे.

राज्यसभा निवडणुकीची पुरावृत्ती होईल?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसभेच्या निवडणुकीनंतर सांगितले होते की, राज्यसभेची निवडणूक ही प्रत्यक्ष असूनही शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीचे मतदान गुप्त पद्धतीने होते. त्यामुळे भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच पराभूत झाल्याचे भाजपने सांगितले होते. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्या हॉटेलमध्ये आहेत त्याच हॉटेलमध्ये राम शिंदे मुक्कामी थांबल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT