Rohit Pawar-Devendra Fadnavis-Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar congratulates CM Shinde : रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारचं यासाठी केलं अभिनंदन !

Maharashtra Politics : राज्यातील युवांना नक्कीच मदत होणार आहे," असे टि्वट रोहित पवार यांनी केलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्यात वर्षभरापूर्वी सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आलं. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला गेले. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात आले का?" असा सवाल महाविकास आघाडीतील नेत्यांनी उपस्थित केला होता.

काही कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला होता. मविआ सरकारने केलेले प्रयत्न आता पूर्णत्वास येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी टि्वट करीत शिंदे-फडणवीस सरकारचं अभिनंदन केलं आहे.

"गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये आघाडी सरकारने Davos मध्ये Renew Power कंपनीसोबत ५० हजार कोटीच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला होता. त्यानुसार Renew Power ही कंपनी महाराष्ट्रात १८ हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेले प्रयत्न पूर्णत्वास येत असून यामुळं राज्यातील युवांना नक्कीच मदत होणार आहे," असे टि्वट रोहित पवार यांनी केलं आहे.

"या गुंतवणुकीसाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे व सुभाष देसाई यांचे आभार. शिवाय हा प्रकल्प बाहेरील राज्यात जाऊ न देण्यासाठी व मविआ सरकार काळातील प्रकल्प म्हणून नेहमीप्रमाणे स्थगिती न देता या प्रकल्पासाठी प्रयत्न केल्याबद्दल आत्ताच्या सरकारचंही अभिनंदन,"असे रोहित पवार यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

दाओसमध्ये (Davos) महाराष्ट्र राज्याला (Maharashtra) 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. यामुळं सुमारे 10 हजार लोकांना प्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी जानेवारी महिन्यात दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT