Rohit Pawar
Rohit Pawar sarkarnama
मुंबई

खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर...! रोहित पवार संतापले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Shivaji Maharaj) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध केला जात आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosale) यांनीही राज्यपालांनी हे वक्तव्य मागे घेण्याची विनंती केली आहे. तर राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेगा, असं राज्यपाल म्हणाले आहेत. या वक्तव्याचा राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress), शिवसेनेसह (Shiv Sena) विविध शिवप्रेमी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत राज्यपालांनी माफी मागावी, असं म्हटले आहे. ‘खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे. असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे,’ अशी टीका पवार यांनी केली आहे. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं, असा इशाराही पवार यांनी दिला.

उदयनराजे यांनीही ट्विट करत राज्यपालांनी हे वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. ‘राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे’, असं उदयनराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले राज्यपाल?

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले, आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. शक्तीची सर्वत्र पूजा होते, राम मंदिरात कार्यक्रम सुरू असतांना मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. `राजा-महाराजा चक्रवर्ती सब गुरू बिना कुछ भी नही. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेगा, मै शिवाजी और चंद्रगुप्त का छोटा नही बता रहा, लेकीन गुरू का बडा स्थान होता है. असेही कोश्यारी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT