राज्यपालांनी भावना दुखावल्या! उदयनराजेंचीही वादात उडी

समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेगा, असं राज्यपाल म्हणाले आहेत. राज्यपालांनी हे विधान केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari
Udayanraje Bhosale, Bhagat Singh KoshyariSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Shivaji Maharaj) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, असं विधान कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्यानंतर विविध स्तरांवरून त्यांचा निषेध केला जात आहे. आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosale) यांनीही या वादात उडी घेतली आहे.

गुरूंचे महात्म्य सांगताना राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेगा, असं राज्यपाल म्हणाले आहेत. राज्यपालांनी हे विधान केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari
भाजपच्या बोर्डीकरांकडून भांबळे गटाचा धुव्वा; निर्विवाद वर्चस्व राखत उधळला गुलाल

यावरून वाद निर्माण झाला असून उदयनराजे यांनी ट्विट करत राज्यपालांनी हे वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. ‘राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे’, असं उदयनराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यपालांच्या या वक्तव्याचा काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) विविध शिवप्रेमी संघटनांनी निषेध केला आहे. संभाजी ब्रिगेडनेही (Sambhaji Brigade) राज्यपालांवर टीका करत समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असं ठासून सांगितले आहे. राष्ट्रवादीकडून पुणे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

काय म्हणाले राज्यपाल?

दरम्यान, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले, आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. शक्तीची सर्वत्र पूजा होते, राम मंदिरात कार्यक्रम सुरू असतांना मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. `राजा-महाराजा चक्रवर्ती सब गुरू बिना कुछ भी नही. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेगा, मै शिवाजी और चंद्रगुप्त का छोटा नही बता रहा, लेकीन गुरू का बडा स्थान होता है. असेही कोश्यारी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com