Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar : आजोबांसारखाच रोहित पवारांचा 'कॉन्फिडन्स'; तारखेआधीच ईडीच्या कार्यालयात जाणार ?

Jui Jadhav

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहेत. रोहित पवारांना बुधवारी (ता.24 जानेवारी) ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ईडीच्या या समन्सनंतर रोहित पवारांनी 'एक्स'वर आपली प्रतिक्रिया देत थेट ईडीलाच आव्हान दिलं आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा काही संबंध होता का? याविषयी ही चौकशी होणार आहे. ईडीच्या या समन्समुळे आमदार पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने चौकशीसाठी 24 तारखेला बोलावलं आहे. मात्र 24 ला कशासाठी 22 किंवा 23 तारखेलाच येतो, असं थेट आव्हान त्यांनी दिलं आहे. त्यामुळे यावर ईडीकडून काय भूमिका घेण्यात येते, ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात स्वत:हून ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. ईडीने दाखल केलेला गुन्हा नेमका काय ? हे समजून घेण्यासाठी ईडीच्या कार्यालयात जाण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, त्यानंतर पवारांच्या समर्थनार्थ त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शनं करण्यात आले होते.

ईडीचे कार्यालय हे राष्ट्रवादीच्या कार्यालया शेजारीच असल्यामुळे पूर्ण परिसराला कार्यकर्त्यांकडून घेराव घालण्यात आला होता. यानंतर मात्र, बँक घोटाळ्याप्रकरणी पवारांच्या चौकशीची गरज नसून भविष्यातही या चौकशीची गरज पडणार नसल्यांचे स्पष्टीकरण ईडीने दिले होते. आता अशाच प्रकारे रोहित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते उतरण्याची शक्यता आहे. शरद पवार हे ईडी कार्लायात चौकशीसाठी न घाबरता निघाले होते. आता हाच आत्मविश्वास रोहित पवारांमध्ये देखील दिसून येत आहे. ईडीने ज्या दिवशी चौकशीला बोलावलं आहे, त्या आधीच रोहित पवार हे चौकशीला जाण्यासाठी तयार आहेत.

रोहित पवार ट्वीटमध्ये काय म्हणाले ?

"ईडीच्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन/मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो. परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात, म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. म्हणूनच ईडीला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर 24 तारखेऐवजी 22 किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ईडी ही विनंती मान्य करेल", असं रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

(Edited by : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT