Rohit Pawar : मोठी बातमी ! रोहित पवारांना इडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

Baramati Agro Case : बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणात रोहित पवारांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले...
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना इडीकडून समन्स बजावण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणात इडीकडून हे समन्स बजावण्यात आले आहेत. रोहित पवारांना बुधवारी (ता. 24 जानेवारी) इडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात या समन्सद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. प्रदूषण नियंत्रक मंडळाने बारामती अ‍ॅग्रो कंपनीला 72 तासात प्लान्ट बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर रोहित पवारांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईला स्थगिती दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar
BJP Politics : भाजपचं लक्ष्य, निवडणुकीआधी ठाकरेंचा बंदोबस्त

यानंतर काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्याशी संबंधित पुणे, बारामती आणि इतर अशा सहा ठिकाणी इडीने छापेमारी केली होती. इडीच्या पथकाने एकूण सहा ठिकाणी हे धाडसत्र राबवले होते. यानंतर आता आमदार रोहित पवारांनाच इडीने समन्स बजावत बुधवारी (ता. 24 जानेवारी) इडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा काही संबंध होता का? याविषयी ही चौकशी होणार आहे. इडीच्या या समन्समुळे आमदार पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

R...

Rohit Pawar
Thackeray Vs Narwekar : नार्वेकरांना घेरण्यासाठी ठाकरेंची मोठी खेळी; मुंबईनंतर आता पुण्यात भरवणार 'जनता न्यायालय' ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com