Amol Kolhe News: Sarkarnama
मुंबई

Amol Kolhe Resignation Update: खासदार अमोल कोल्हेंचा राजीनामा खिशातच; पवारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

NCP Political News: खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेवून आपण खासदारकीचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते.

सरकारनामा ब्यूरो

Political Twist In Maharashtra: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. यावेळी अजितदादांच्या शपथविधी सोहळ्याला हजर असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका जाहीर करत आपण शरद पवार यांच्याबरोबरच राहणार असल्याचं सांगितलं.

यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेवून आपण खासदारकीचा राजीनामा देण्याचे संकेतही दिले होते. यानंतर आज खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटी दरम्यान शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांना महत्वाचा सल्लाही दिला असल्याचं खुद्द त्यांनीच सांगितलं आहे.

अमोल कोल्हे यांनी सांगितलं की, "मी माझी भावना शरद पवार यांच्यासमोर मांडली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर राजकारणातील नैतिकता, विश्वासार्हता या सर्वच गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मी शरद पवारांना एक पत्र दिलं आहे. त्यामध्येही हीच भूमिका मांडली. स्वराज्य निर्माण केल्यानंतर देखील त्याला रयतेचं राज्य म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श ठेऊन मी राजकारणात आलो", असंही यावेळी अमोल कोल्हे म्हणाले.

पवारांनी अमोल कोल्हेंना काय सल्ला दिला?

अमोल कोल्हे यांनी सांगितलं की,"शरद पवार याचं म्हणणं होतं की, हे सर्व चुकीचं आहे. माझी जी भावना आहे तीच भावना अनेकांची आहे. अनेक मतदारांची भावना आहे, अशा परिस्थितीत आपल्याला तरुणांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.

लोकांनी तुझ्यावर पाच वर्षांसाठी हा विश्वास ठेवला. आणखी आठ-दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून अनेक काही कामं मार्गी लागायचे आहेत. त्यासाठी ज्या गोष्टींसाठी तुला विश्वास ठेवून निवडून दिलं ती जबाबदारी पूर्ण करावीत, असं मार्गदर्शन शरद पवार यांनी केलं", असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT