Dilip Mohite Patil On NCP: आमदार दिलीप मोहिते पाटील को इतना गुस्सा क्यों आया !

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा 'यू टर्न'
NCP News
NCP NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडात त्यांच्याबरोबर राहणार असल्याचे रविवारी (ता.२) सांगणारे खेडचे पक्षाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी २४ तासात 'यू टर्न' घेत कार्यकर्ते आणि खेडच्या जनतेशी चर्चा करून हा निर्णय घेणार असल्याचे सोमवारी (ता.३) सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवारांसह आंबेगावचे पक्षाचे आमदार आणि रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतलेले दिलीप वळसे-पाटील यांच्यावरही कडाडून हल्लाबोल केला.

मुंबईतील शपथविधीनंतर आमदार मोहिते हे शिर्डीला गेले. तेथून काल परतल्यावर त्यांनी खेड येथे आपलेच नाही, तर पक्षाचेही नुकसान केलेल्या व पक्षाला अडचणीत आणलेल्या वळसेंना पुन्हा मंत्री केल्याबद्दल संताप व्यक्त केला. वळसेंवर संकट असल्याने त्यांना मंत्री केल्याचे अजितदादांचे म्हणणे त्यांना पटलेले दिसले नाही. माझ्यावर अनेक संकटे येऊनही, मग मला का मंत्री केले नाही, अशी विचारणा त्यांनी केली.

NCP News
NCP Whip News: मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या दोन्ही गटानं टाकला मोठा डाव; आमदारांना व्हिप जारी....

राज्यमंत्री करण्याचा शब्द देऊनही अजितदादांनी तो न पाळल्याने मोहितेंची नाराजी बाहेर पडल्याचे दिसून आले. यावेळी मला मंत्रीपद देण्याची व वळसेंना दूर ठेवण्याची संधी अजितदादांकडे असूनही त्यांनी ती न साधल्याबद्दल त्यांचा राग व्यक्त झाला. पवारसाहेबांनीही आमच्याकडे फारसे लक्षच दिले नाही. ते हो म्हणायचे पण करायचे काहीच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

माझ्या खेड मतदारसंघातील कार्यक्रम ते वळसेंना विचारून घ्यायचे. अशा एका कार्यक्रमात, तर मला भाषण करू न देता अपमानित करण्याचा आल्याची कटू आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. दिलीप वळसे-पाटील यांच्या राजकारणाचा मला खूप त्रास झाला, असे आमदार मोहिते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते गृहमंत्री असताना त्यांनी माझे एकही काम केले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

NCP News
Maharashtra Politics: अजितदादांच्या बंडातील 'त्या' तीन नेत्यांवर राज ठाकरेंना संशय; म्हणाले...

उलट एमआयडीसीत माझा त्रास होतो, असे डुप्लीकेट उद्योजक उभे करून त्यांनी सांगितले. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्य़ांना पोलिसांचा मोठा त्रास झाला. २०१४ च्या विधानसभेला त्यांनी माझ्या विरोधकांना एक करून माझा पराभव घडवून आणला, असा खळबळजनक आरोपही त्यांनी यानिमित्ताने केला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com