Sayaji shinde join ajit pawar NCP Sarkarnama
मुंबई

Sayaji shinde join NCP : राष्ट्रवादीत प्रवेश करताच सयाजी शिंदेंकडे मोठी जबाबदारी! अजितदादांची घोषणा

Jagdish Patil

Sayaji shinde join ajit pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. या शिंदे यांनी पक्षात प्रवेश करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

सयाजी शिंदे राष्ट्रवादीत सामील होत आहेत हे त्यांचं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे या पक्षात त्यांच्याकडे मोठ्या जबाबदार्‍या देणं आवश्यक आहे. याबाबत आमची चर्चा झाली असून ते आगामी काळात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून राज्यभरात काम करतील अशी घोषणा अजितदादांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, सयाजी शिंदे यांचे चित्रपट जागरुकता वाढवणारे असतात. त्यांची कारकीर्द अनेक सामाजित उपक्रमांचं नेतृत्व करणारं आहे. सरकारमध्ये काम करताना अनेकदा त्यांच्याशी माझी भेट झाली. सयाजीराव यांना झाडांची आवड आहे. ते सतत सांगत असतात की आपले डोंगर बकाल होत चालले आहेत, चांगल्या प्रकारची झाडं लावली पाहिजेत.

सह्याद्री देवराई मार्फत ते वृक्षारोपण करतात मी त्यांचं काम जवळून पाहिलं आहे. शिवाय त्यांनी एक चांगली संकल्पना सांगितली की, शिर्डी किंवा सिद्धिविनायक अशा तिर्थक्षेत्राला भेटी दिल्यानंतर लोकांना प्रसाद म्हणून आपण जर झाडाचं रोपटं दिलं तर लोक ते घरी नेऊन श्रद्धेने वाढवतील आणि वृक्षारोपनाला चालना मिळेलं.

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

तसंच यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून राज्यभरात काम करतील असंही अजित पवार यांनी जाहीर केलं. ते म्हणाले, "सयाजी शिंदे राष्ट्रवादीत सामील होत आहेत हे त्यांचं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे या पक्षात त्यांच्याकडे मोठ्या जबाबदार्‍या देणं आवश्यक आहे. याबाबत आमची चर्चा झाली असून ते आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून राज्यभरात काम करतील."

तर सयाजी शिंदे यांचा पार्टीत योग्य आदर सन्मान राखला जाईल हे मी पक्षाचा अध्यक्षाच्या नात्याने सांगतो शिवाय माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडूनही तो केला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT