Indapur, 11 October : इंदापूरमधून आम्ही शंभर नव्हे; एकशे दहा टक्के अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आम्ही आता फार्म काढत नसतो. आम्ही एकवेळ जेलमध्ये बसू पण निवडणूक लढवू. तुम्ही आम्हाला मतं द्याल, असे आवाहन करत सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी इंदापूरमधून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार गटातील सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी इंदापूरमध्ये परिवर्तन मेळावा घेत विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्या मेळाव्यातील सभेत माने बोलत होते.
दशरथ माने (Dashrath Mane) म्हणाले, आम्ही दोन हजार कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्याकडे बारामतीला गेलो होतो. त्या वेळी त्यांच्याकडे आमच्या पाच लोकांपैकी कोणालाही उमेदवारी द्या. नाही तर इंदापूरची जनता नाराज होईल, असे मी साहेबांपुढे भीत भीतच म्हटले होते.
त्यांना (माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याचा चुकीचा निर्णय घेऊ नका. साहेब हा पठ्ठ्या जर तंबूत घुसला तर अख्खा तंबूच घेऊन जाईल, असं म्हटलं होतं आणि तसेच झालं. आमचा शरद पवारांचा राष्ट्रवादीचा तंबूच ते उचलून घेऊन गेले आहेत, असा हल्लाबोल माने यांनी केला.
इंदापूर तालुक्याच्या परिवर्तनासाठी अपक्ष निवडणूक लढवायची आहे. आम्ही धावा करतोय, साहेब अजूनही निर्णय बदला साहेब...आपला निर्णय बदला. जेवढे लोक सभेला उपस्थित आहेत, तेवढेच लोक घरी आहेत.
ते म्हणतात की माने भेकड आहेत, माघार घेतात की काय. आप्पासाहेब जगदाळे यांनीही दोन ते तीन वेळा माघार घेतली आहे. त्यामुळे ते लोक घाबरून आले नाहीत. तुम्हा दोघांपैकी एकाचा फार्म राहू द्या. आम्ही घराबाहेर पडतो, असे मला अनेकांनी भेटून सांगितले आहे, असेही माने यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.