Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule, Jayant Patil Sarkarnama
मुंबई

NCP Politics : राष्ट्रवादी युवक काँग्रेस कुणाची?

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव

Mumbai News : अजित पवार (Ajit Pawar) 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट अशी झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोग आणि आमदार अपात्रतेचा वाद विधानसभाध्यक्षांच्या कोर्टात आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या अधिकृत पेजवरील माहिती सर्वांना बुचकळ्यात टाकणारी आहे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडून सहा महिने झाले तरी राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या अधिकृत पेजवर अजित पवार यांचा फोटो कायम आहे. या पेजवर अजित पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जयंत पाटील यांचे फोटो एकत्र झळकताना दिसतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पड़ून दोन गट झाले. तशीच फूट राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसमध्येही पडली. पण, अजूनही दोन्ही गटांचे नेते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अधिकृत पेजवर नांदत असल्याचे दिसते. मेहबूब शेख युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांचाही फोटो या पेजवर आहे.

अजित पवार जेव्हा भाजप आणि शिंदेंसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो वापरत असत. अखेर पवारांनी अजित पवार गटाला कोर्टात जाण्याची तंबी दिल्यानंतर त्यांनी शरद पवारांचा फोटो वापरणे थांबवले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार (दिवंगत) यशवंतराव चव्हाण, अजित पवार आणि इतर नेत्यांचे फोटो वापरले जातात. तशी घोषणा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली होती.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसबाबत अस्पष्टता

राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रीम कोर्टात अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे. मात्र आता त्याचा सर्वस्वी निर्णय विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे.

विधानसभाध्यक्षांनी दोन्ही गटांकडून कागदपत्रे मागवली आहेत आणि दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी आता सगळे सज्ज आहेत. शिवसेनेत जशी परिस्थिती निर्माण झाली, तशीच परिस्थिती आता राष्ट्रवादीमध्येही दिसून येत आहे. जो निर्णय शिवसेनेबाबत लागेल, तसाच निकाल राष्ट्रवादीबाबतही लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत तरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अधिकृत पेजवरील दोन्ही गटांतील नेते दिसतील, अशी शक्यता आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT