Jayant Patil son Pratik Patil wedding sarkarnama
मुंबई

Jayant Patil : जयंत पाटलांना अश्रू अनावर, शरद पवारांसह उपस्थितही भावुक

Jayant Patil : इस्लामपूर-बहे राजेबागेश्वरच्या पूर्वेस हा शाही लग्नसोहळा पार पडला.

सरकानामाब्युरो

Jayant Patil son Pratik Patil wedding : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचा शाही विवाह सोहळा रविवारी थाटात पार पडला, या शाही विवाह सोहळ्याची चर्चा काही दिवसापासून समाजमाध्यमांवर होती. या विवाहास राजकारणातील बहुसंख्य नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्याचे व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले आहेत. (Jayant Patil son Pratik Patil wedding news update)

इस्लामपूर-बहे राजेबागेश्वरच्या पूर्वेस हा शाही लग्नसोहळा पार पडला. सांगलीतील किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्सचे सर्वेसर्वा उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची सुकन्या अलिका यांच्यासोबत प्रतीक यांचा विवाह झाला. या विवाहाप्रसंगी जयंत पाटील हे भावुक झाले.

उपस्थितांचे आभार मानत असताना जयंतरावांना त्यांच्या आई-वडीलांचा उल्लेख केला,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव त्यांनी घेतलं अन् त्यांना अश्रू अनावर झाले. आभार मानताना त्यांचा कंठ दाटून आहे, त्यांना शब्द फुटत नव्हता. यामुळे उपस्थितही भावुक झाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहु महाराज, खासदार श्रीनिवास पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, विधानसभआ अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांसह अनेक मोठे नेते या विवाहास उपस्थित होते.

  • प्रतीक पाटील हे अभियंते असून त्यांनी त्यांचे शिक्षण लंडन येथून पूर्ण केले आहे.

  • २०१४ पासून ते वाळवा इस्लामपूर मतदार संघात सक्रिय राजकारण करत आहेत.

  • अलिका किर्लोस्कर यांनीही बिझनेस क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले आहे.

  • त्या किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT