Sanjay Raut : भाजपचे टगे किती दिवस तोंड शिवून बसणार ; राऊत संतापले

Sanjay Raut : महाराष्ट्र खवळलेला आहे. आम्ही शांत बसणार नाही.
Sanjay Raut and Devendra Fadanvis
Sanjay Raut and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमान केल्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना परत पाठवावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. खासदार उदयनराजे, छत्रपती संभाजी राजे, आमदार शिवेंद्रराजे यांनीही राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी आज (सोमवारी) शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला, यावर हे सरकार अजून हात चोळत, तोंड शिवून बसले आहेत.भाजपचे हे टगे महाराष्ट्राला शहाणपण शिकवीत आहेत," असे राऊत म्हणाले.

"राज्यपालांच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र आला आहे. कोश्यारी, सुंधाशु त्रिवेदी यांनी मागितली पाहिजे. शिवाजी महाराजाचा अपमान केल्यानंतर पंडित नेहरु, मोरारजी देसाई यांनी माफी मागितली होती," "राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र खवळलेला आहे. आम्ही शांत बसणार नाही," असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut and Devendra Fadanvis
Sanjay Raut : मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॅानी लिव्हर यांची मिमिक्री पाहू" ; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

शिवाजी महाराज यांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे.राज्यपालांचे कार्यक्रम उधळून लावणे हि जनभावना आहे,"

Sanjay Raut and Devendra Fadanvis
Uddhav Thackeray : ‘कामाख्या देवी कोपली तर तुमची खैर नाही " ; खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच !

राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची मिमिक्री केली, यावर पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, "राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे. आम्हाला मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॅानी लिव्हर, राजू श्रीवास्तव यांची मिमिक्री पाहू"

यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या विधानावर सरकारने अद्याप कारवाई केली नाही, यावरुन राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com