Aryan Khan Drugs Case News: Sameer Wankhede and Nawab Malik
Aryan Khan Drugs Case News: Sameer Wankhede and Nawab Malik sarkarnama
मुंबई

Drugs-on-cruise case : मलिकांनी वानखेडेंवर केलेले आरोप खरे ठरत आहेत..; रोहित पवार म्हणतात..

सरकारनामा ब्यूरो

Rohit Pawar on Sameer Wankhede : एनसीबीचे (नार्को टेस्ट कंट्रोल ब्यूरो) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाच तासांहून अधिक काळ चौकशी केली. आजही समीर वानखेडे यांची चौकशी सुरु आहे. त्यासाठी दिल्ली येथून सीबीआयचे विशेष पथक आले आहे.

समीर वानखेडे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांना आज अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वानखेडे यांच्या चौकशीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी वानखेडेंवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला होता. त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.त्यांची आठवण रोहित पवारांनी यानिमिताने करुन दिली आहे.

मुंबईतील बीकेसीमधील कार्यालयात सीबीआयकडून वानखेडेचा जबाब नोंदविण्याचे काम सुरु आहे. चौकशीला समोरे जाताना वानखेडे यांनी ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. शनिवारी चौकशी झाल्यानंतर त्यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतलं होते, आपल्याला न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले होते.

वानखेडे यांच्या चौकशीत रोज नवे खुलासे बाहेर येत आहेत. यावर रोहित पवार यांनी लक्ष वेधलं आहे. ते म्हणाले, "नवाब मलिक यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आता वानखेडे यांच्या बाबतीत सत्य होताना पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात मलिक बोलत असल्याचा आरोप करुन सरकारने त्यांना तुरुंगात टाकले,"

"अनेक प्रकरणात भाजपचे आरोप यापूर्वी खोटे ठरले आहेत. भाजपच्या नेत्यांना राजकारणाशिवाय काही कळत नाही हे जनतेला कळलं आहे," असे पवार म्हणाले. 'राजकारणासाठी लोकांना फोडण्यासाठी भाजपकडून पैशांचा वापर केला जात आहे. हे पैसे कुठून येतात याचा अंदाज जनतेला येत आहे,' असे रोहित पवार म्हणाले.

समीर वानखेडे आज सलग दुसऱ्या दिवशी CBI कार्यालयात दाखल झाले आहे. काल समीर वानखेडे यांची सीबीआय कडून पाच तास चौकशी करण्यात आली होती. आर्यन खान कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात खंडणी मगितल्याचा आरोप हा समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT