Odisha Cabinet : मंत्रीमंडळात उद्या मोठे फेरबदल ; नवीन चेहऱ्यांना संधी..

Odisha Cabinet News : देबी प्रसाद मिश्र, अमर प्रसाद सत्पथी आणि बद्री नारायण पात्र यांचा समावेश पटनायक सरकारमध्ये होऊ शकतो.
naveen patnaiks
naveen patnaiks sarkarnama
Published on
Updated on

Odisha Cabinet News : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे आपल्या मंत्रीमंडळात सोमवारी फेरबदल करण्याची शक्यता आहे. पटनायक यांच्या मुख्यमंत्रीपदाचा हा पाचवा कार्यकाळ आहे. (odisha cabinet chief minister naveen patnaik may reshuffle on monday)

मुख्यमंत्री म्हणून पटनायक यांच्या पाचव्या कार्यकाळातील त्यांच्या मंत्रीमंडळाचा हा दुसरा फेरबदल असेल. उद्या (सोमवारी) साडेनऊ वाजता लोकसेवा भवन येथे मंत्रीमंडळात फेरबदल होणार आहे.

naveen patnaiks
RBI withdraw Rs 2,000 : नोटबंदीनंतर सापडलं मोठं घबाड ; सचिवालयाजवळ दोन हजाराच्या नोटा, सोन्याचं बिस्किट..

राज्यमंत्रीमंडळात तीन मंत्रीपदे रिक्त आहेत. त्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आहे. राज्यपाल गणेशी लाल हे हरियाणा येथे गेले आहेत ते सोमवारी परत येणार आहेत. ते आज (रविवार) सांयकाळपर्यंत ओडिशा येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

गेल्या आठवड्यात शालेय शिक्षणमंत्री समीर रंजन दास, आणि कामगारमंत्री श्रीकांत साहू यांनी राजीनामा दिला आहे. जानेवारीत आरोग्यमंत्री नबा किशोर दास यांच्या निधनानंतर त्यांची जागा रिक्त आहे.

naveen patnaiks
RBI withdraw Rs 2,000 Note : नोटबंदीवर अजित पवार म्हणाले.."महिलांकडे पैसे ठेवलेले असतात.. ; ..आधी त्या नोटा बदलून घ्या !

ओडिशाच्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्र्यांसह २२ मंत्री असतात, सध्या त्याची संख्या १९ आहेत. प्रफुल्ल सामल, देबी प्रसाद मिश्र, अमर प्रसाद सत्पथी आणि बद्री नारायण पात्र यांचा समावेश पटनायक सरकारमध्ये होऊ शकतो.

झारसुगुडा पोटनिवडणूक जिंकणाऱ्या दिवंगत नबा किशोर दास यांच्या कन्या दीपाली दास यांची मंत्रीमंडळात वर्णी लागू शकते का, याबाबत साशंकता आहे.

तर दुसरीकडे सहा वेळा आमदार म्हणून निवडणूक आलेले अरुखा यांना मंत्रीमंडळात संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. सुशांत सिंह, सारदा नायक, उमाकांत सामंत्रे यांच्या नावाचीही चर्चा आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com