Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil News Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : लोकसभेच्या १६ जागांवर शरद पवार गट दावा ठोकणार; आघाडीत चल-बिचल...

Lok Sabha Seat Allocation : छत्रपती संभाजीनगरचीही शक्यता पडताळून पाहण्यात येणार आहे.

Chetan Zadpe

Mumbai News : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका नजीक येऊन ठेपल्या आहेत. यामध्ये सत्ताविरोधी रोषाचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. महाविकास आघाडीत यासंदर्भात जागावाटपाची चर्चा अजूनही सुरू झाली नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) लोकसभेच्या १६ जागांवर आपली ताकद असल्याचा दावा करत, या जागा लढवण्याचे सुतोवाच दिले आहे. या जागा आघाडीत आपण लढवणार असा आग्रह शरद पवार गटाकडून धरला जाणार आहे. (Latets Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार गटाकडून बारामती, बीड, हातकणंगले, कोल्हापूर, रावेर, सातारा, सांगली, भंडारा, ईशान्य मुंबई, माढा, शिरूर आणि मावळ आणि अहमदनगर या लोकसभेच्या जागांवर शरद पवार गटासाठी अत्यंत सकारात्मक वातावरण आहे, येथे पक्षाला हमखास यश मिळेल असे पक्षाला विश्वास आहे. मराठवाड्यातील बीड या जागेनंतर छत्रपती संभाजीनगरचीही शक्यता पडताळून पाहण्यात येणार आहे.

अजित पवारांनी बंड करत शिंदे- फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे अनुकूल वातावरण असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाचा या निर्णय कसाही असला तरी शरद पवार यांच्याबाबत एक सहानुभूतीची लाट निर्माण होणार असल्याचे काही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT