Ajit Pawar News : अजित पवारांची बारामतीत पवार कुटुंबींयांसह शारदोत्सव कार्यक्रमास उपस्थिती

Ajit Pawar and Supriya Sule : या कार्यक्रमादरम्यान बेला शेंडे व सहकारी वादकांचा अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी एकत्र व्यासपीठावर येत सत्कार केला.
Ajit Pawar and Supriya Sule
Ajit Pawar and Supriya Sulesarkarnama
Published on
Updated on

Baramati News : डेंगीच्या आजारातून बरे झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रथमच बारामतीत शारदोत्सव या कार्यक्रमात उपस्थिती लावत, सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते. दरवर्षी दिवाळीमध्ये पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने शारदोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar and Supriya Sule
Uddhav Thackeray News :''अजितदादांना ताप की सहकाऱ्यांचा मनस्ताप, हे...'' उद्धव ठाकरेंचा टोला!

यंदा बेला शेंडे यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.

अजित पवार यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर कालच अजित पवार यांनी दिल्लीचा दौरा केला होता. त्यानंतर आज बारामतीत त्यांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे पवार कुटुंबीयात मिसळत शारदोत्सवाच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमादरम्यान बेला शेंडे व सहकारी वादकांचा अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी एकत्र व्यासपीठावर येत सत्कार केला.

Ajit Pawar and Supriya Sule
MLA Prajakt Tanpure : ''सत्ताधाऱ्यांबरोबर गेलो असतो तर...'' आमदार तनपुरेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

बारामतीकरांनी देखील या प्रसंगी टाळ्यांच्या कडकडात त्यांना दाद दिली. अजित पवार यांनी या शारदोत्सवात पूर्णवेळ कार्यक्रमाला उपस्थिती लावत कार्यक्रमाचा आनंद घेतला. सुनेत्रा पवार याही या प्रसंगी उपस्थित होत्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com