Maharashtra local elections : राज्यात नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महापालिकेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने जाहीर केला आहे. प्रभाग रचनेवर अंतिम मोहोर निवडणूक आयोग उमटवणार आहे.
पण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, प्रभाग रचनेत घोटाळा होण्याची शंका उपस्थित करताना, प्रभाग रचना ही सत्ताधारी यांच्या हातातील खेळ बनू नये, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन ते साडेतीन वर्षांपासून झालेल्या नाही. आता त्याची तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रभाग रचनेची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांनी त्यासाठी नोटिफिकेशन काढले आहे. या प्रभाग रचनेवर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य करताना घोटाळ्याची शंका उपस्थित केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "2017 नंतर 2022ला प्रभाग रचना झाली होती. त्यात प्रचंड घोटाळा झाला. मनाला येईल, त्याप्रमाणे प्रभाग रचना झाली. लोकसंख्या आणि प्रभागांच्या हद्दीमध्ये घोटाळा झाला. निवडणूक आयोगाचे (Election Commission) अधिकाऱ्यांना घरी बोलावून राजकीय नेते प्रभाग रचना करतात. आता असे जर होणार असेल, तर प्रभाग रचना करू नये".
'कोणता प्रभाग कसा होता, 2017 नंतर 2022 मधील दोन्ही प्रभाग रचना कशी झाली, याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा करताना महापालिका आयुक्त फक्त त्यावर मोहर लावतात. पण प्रभाग रचना कशी झाली, कोणी केली, हे कोण बघणार, प्रभाग रचनचेबाबत दोन-दोन पुरावे आहेत. शर्मा यांनी केलेली प्रभाग रचना आणि नंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर झालेली प्रभाग रचनेचे सगळे पुरावे आहेत', असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
प्रभाग रचना ही सत्ताधारी हाताचा खेळ बनवू नये. अधिकारी ज्यांना घाबरतात त्यांना घाबरून, अधिकारी प्रभाग बनवतात. लोकशाहीची इथंच क्रूर हत्या होते. प्रभाग रचनेत घोळ कसा होता, याचे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पुरावे देतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
निवडणूक आयोग हा स्वतंत्र आहे. तरी 16 हजार मत एका रात्रीत वाढतात, हा कसला जनतेचा कौल. पाच वर्षांत जी नाव वाढली नव्हती ती चार महिन्यात वाढली. हे घडणार असेल, तर याला कोणीही रोखू शकत नाही. गांभीर्यानं नाही घेतलं तर काहीही करू शकतात. आताच्या प्रभाग रचनेत, घोटाळ्याची थोडी जरी शंका आल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.