Tutari Vs Trumpet News Sarkarnama
मुंबई

NCP Sharad Pawar: पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा; लोकसभेला फटका बसलेल्या 'पिपाणी' चिन्हाबाबत आयोगाचे नवे महत्त्वाचे 'हे' आदेश

Sharad Pawar Party Demands Freezing Pipani Symbol: लोकसभेत मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानंतर शरद पवारांच्या पक्षानं निवडणूक आयोगाकडे 'पिपाणी' चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्टीकरण दिले होते. शरद पवार गटाने तीन विनंती केल्या होत्या, त्याची नोंदही आयोगाने घेतली होती.

Deepak Kulkarni

New Delhi News : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह घेऊन 10 पैकी तब्बल 8 जागा जिंकल्या. मात्र, या निवडणुकीत 'तुतारी' आणि 'पिपाणी'या चिन्हांमुळे पवारांच्या पक्षाला मोठा फटका बसल्याचं दिसून आलं.त्यानंतर पवारांच्या पक्षाकडून पिपाणी हे चिन्ह गोठवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जोरदार प्रयत्न केले.

पण विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवण्यास नकार दिला होता.आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने 'पिपाणी' चिन्हाबाबत नवे सुधारित आदेश दिले आहेत. हे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

मुख्य निवडणूक (Election) अधिकारी कार्यालयाने गुरुवारी (ता.31) रात्री उशिरा पिपाणी चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण आदेश एका परिपत्रकाद्वारे दिले.त्यात तयार केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीमधील 'Trumpet' या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरण 'तुतारी' ऐवजी 'ट्रम्पेट' असे सुधारित करण्यात येत आहे. या संदर्भात निवडणूक चिन्हांचा तक्ता PDF मध्ये आपणांस उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करते वेळी व अन्य आवश्यक प्रयोजनासाठी सुधारित तक्त्यामध्ये नमूद केल्यानुसार 'ट्रम्पेट' मुक्त चिन्हाचे मराठी नाव तुतारी ऐवजी 'ट्रम्पेट' असे दर्शविण्यात यावे असा महत्त्वपूर्ण आदेश निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकात दिला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी कडवी लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही बाजूने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.त्याचवेळी आता निवडणूक आयोगाचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे.

राज्यात शिवसेनेनंतर 2 प्रमुख प्रादेशिक पक्षात फूट पडली. त्यात अजित पवारांना राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी मिळाली तर शरद पवारांच्या गटाला तुतारी हे नवीन चिन्ह दिले. लोकसभा निवडणुकीत पवारांनी 8 जागा जिंकल्या. मात्र, या निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेत पवारांच्या गटाला फटका बसल्याचं दिसून आले.

लोकसभेत मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानंतर शरद पवारांच्या पक्षानं निवडणूक आयोगाकडे 'पिपाणी' चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्टीकरण दिले होते. शरद पवार गटाने तीन विनंती केल्या होत्या, त्याची नोंदही आयोगाने घेतली होती.. पहिला आक्षेप त्यांचे चिन्ह मतपत्रिकेवर छोटे दिसते ते योग्य नाही आणि दुसरा आक्षेप तुतारीसारखं दिसणारं दुसरे चिन्ह हटवावे अशी मागणी केली होती.

आम्ही पहिली विनंती मान्य केली असून आम्ही त्यांच्याकडून आलेल्या आकाराचं चिन्ह मतपत्रिकेवर देणार आहोत. मात्र, पिपाणी हे चिन्ह त्यांच्या पक्षाच्या चिन्हाप्रमाणे समान नाही असं त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्टपणे कळवलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT