Mahayuti in Marathwada: अब्दुल सत्तार- रावसाहेब दानवे संघर्षामुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत!

Abdul Sattar Vs Raosaheb Danve: या दोन नेत्यांमधील वादावादीमुळे मराठवाड्यातील काही मतदारसंघांमधील महायुतीच्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहे
Abdul Sattar- Raosaheb Danve
Abdul Sattar- Raosaheb Danve Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News: मराठवाड्यातील महायुतीच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये सध्या सत्ता संघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावादी मुळे मराठवाड्यातील काही मतदारसंघांमधील उमेदवारांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहे.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मंत्री आणि जालना लोकसभा मतदारसंघातील सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या डॉ.कल्याण काळे यांना उघडपणे मदत केल्याचे जाहीर कार्यक्रमांमधून सांगत तशी कबुलीही दिली. तेव्हापासून सत्तार विरुद्ध दानवे संघर्षाची ठिणगी पडली.

या संघर्षाची चटके मात्र आता महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांनाच बसू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड सोयगावमध्ये बंदोबस्त करण्यासाठी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भाजपच्या सुरेश बनकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पाठवल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोयगाव मधील लढत सत्तार विरुद्ध बनकर अशी होणार हे स्पष्ट आहे. दानवे यांनी टाकलेला हा डाव त्यांच्यावर उलटवण्यासाठी सत्तार यांनी भोकरदन -जाफराबाद विधानसभा मतदारसंघात दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना पाडण्याची भाषा सुरू केली आहे.

Abdul Sattar- Raosaheb Danve
Shivraj Patil Chakurkar : ...अखेर शिवराज पाटील चाकूरकरांनी सुनबाईंनाच दिला आशीर्वाद, म्हणाले...

दुसरीकडे जालना मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री व महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाजपच्या भास्कर दानवे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून रावसाहेब दानवे यांनी इथेही खोतकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभेच्या कन्नड मतदार संघात रावसाहेब दानवे यांनी कन्या संजना जाधव यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधातही डाव टाकला आहे.

अब्दुल सत्तार यांची उपद्रवशक्ती पाहता दानवे यांनीही काही मतदारसंघांमध्ये खेळी केली आहे. अब्दुल सत्तार यांना रोखतानाच दानवे यांना मुलगी संजना जाधव आणि आमदार चिरंजीव संतोष दानवे यांच्या जागा सुरक्षित काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. महायुतीमध्ये अधिकृत उमेदवारांच्या विरोधात झालेल्या बंडखोरीवर राज्यातील नेते मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Abdul Sattar- Raosaheb Danve
Abdul Sattar: शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात 'मविआ'च्या बनकरांची डोकेदुखी वाढली

विशेषता जालना, कन्नड आणि भोकरदन या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना दगाफटका होऊ नये याची काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. यात बंडखोरी टाळून महायुतीचा धर्म सगळ्याच नेत्यांनी पाळावा अशा कानपिचक्या अब्दुल सत्तार, रावसाहेब दानवे या दोन नेत्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहे. सत्तार -दानवे यांच्यातील संघर्षावर तोडगा निघाला तरच जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यात महायुतीला अपेक्षित यश गाठता येईल, असं दिसत आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com