Sharad Pawar News
Sharad Pawar News Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : बारसू रिफायनरी बाबत सामंतांच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले, " आंदोलकांच्या भावना..."

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar on barsu refinery project : बारसू सोलगाव (जि. रत्नागिरी) येथील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी दोन दिवसापासून सर्व्हेक्षण सुरु झालं आहे.पण या सर्व्हेक्षणाला काही स्थानिकांनी विरोध केला आहे. काही महिला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं. या प्रश्नाबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

सामंतांच्या भेटीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या प्रकरणावर पवारांनी भूमिका मांडली आहे.

शरद पवार म्हणाले, "बारसू येथील प्रकल्पाबाबचा आढावा उदय सामंतांनी दिला आहे. या प्रकल्पासाठी कुणाचीही जमिनी घेतलेली नाही, या ठिकाणी माती परीक्षण सुरु आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे. स्थानिक आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन यावर तोडगा काढावा, अशी सूचना सामंत यांना केली होती. ही सूचना त्यांनी मान्य केली आहे. सामंत हे अधिकाऱ्यांसमवेत उद्या (गुरुवारी) आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत,"

"या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे. त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवले पाहिजे, असे मी सामंत यांनी सूचवले आहे. उद्याच्या बैठकीत काय तोडगा निघतो, हे पाहावे लागेल," असे शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहे, याबाबत पवारांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी 'मला माहित नाही,' असे सांगितले. 'सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर मी याबाबत प्रतिक्रिया देणार,' असे पवार म्हणाले.

आंदोलनस्थळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. प्रस्तावित रिफायनरी जेथे होणार आहे त्या माळरानावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी पाठिंबा दिला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT