Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

PM Modi Campaign in Karnataka : कर्नाटकच्या आखाड्यात आता मोदींची एन्ट्री ; ६ दिवसात १५ रॅली..

PM Modi Karnataka Election 2023 : भाजपला काँग्रेस आणि जेडीएसकडून मोठे आव्हान आहे.

PM Modi Campaign in karnataka conduct 15 public meetings road shows : लोकसभा निवडणुक २०२४ ची सेमीफायनल ठरणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत (Karnataka Election 2023) सर्वच पक्षाचा जोरदार प्रचार सुरु आहे.

पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे स्टार प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)हेही आता कर्नाटकच्या आखाड्यात उतरणार आहेत, त्यांचा सभा अन् रॅलीची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.

शुक्रवारपासून (ता. २८) मोदींचा झंझावात दौरा कर्नाटकमध्ये सुरु होत आहे. सहा दिवसाच्या या दौऱ्यात १२ ते १५ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. २८, २९ एप्रिल, ता. ३,४,६ आणि ७ मे रोजी मोदींची रॅली होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

Narendra Modi
Vaijnath Waghmare risigns : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंची शिवसेनेला सोडचिठ्ठी..

पंतप्रधान मोदी आपल्या प्रचाराची सुरवात बेळगाव येथून करणार आहेत. कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगावच्या चिकोडी, कित्तूर, आणि कुडाची येथे त्यांचा दौरा आहे. याशिवाय मोदींचा उत्तर कर्नाटकच्या जिल्ह्यातही दौरा आहे, असे केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमोर कर्नाटकाता पुन्हा सत्ता आणण्याचे आवाहन आहे. भाजपला काँग्रेस आणि जेडीएसकडून मोठे आव्हान आहे. यासाठी भाजपचे मोठे नेते येथे रॅली करीत आहेत.

Narendra Modi
WFI President Brij Bhushan Singh: भाजप खासदार, WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या विरोधात सात कुस्तीपटुंची न्यायालयात धाव

कर्नाटक दौऱ्याबाबत मोदी खूप उत्साहीत असून त्यांच्या रॅलीमुळे कर्नाटकात भाजपचे वातावरण निर्माण होणार आहे. अन्य राज्यापेक्षा कर्नाटकवर भाजपचे विशेष लक्ष आहे. असे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. ही निवडणूक आगामी लोकसभेसाठी सेमीफायनल ठरणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com