Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : राज्यपालांविषयी शरद पवार म्हणाले अन् उपस्थितांमध्ये हशा पिकला..

Bhagat Singh Koshyari News : राज्यपालांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे

सरकारनामा ब्युरो

Bhagat Singh Koshyari News : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीकेची झोड उठवली जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

राज्यपालांच्या या वादग्रस्त विधानामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठीं नाराज असल्याची चर्चा आहे.राज्यपाल पदी विराजमान झाल्यापासून कोश्यारी हे पण नाखूष आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. पवार हे कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी विराजमान झाल्यापासून ते नाखूष आहेत, असं ते सातत्याने सांगत आहेत. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, "आम्हीही नाखुष आहोत. राज्यपालांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, याआधी राज्याला खूप चांगले राज्यपाल मिळाले,हे पहिले राज्यपाल आहेत, त्यांच्या विधानामुळे नेहमीच वाद निर्माण होत आहेत." पवारांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

राहुल गांधी यांची टिंगल..

शरद पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. पवार म्हणाले, "सत्ता हाती असली तरी पाय जमिनीवर पाहिजे," अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा आहे. यावेळी काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' सुरु आहे.

याबाबत पवारांनी गांधींचे कौतुक केले. "राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सामान्य नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांची टिंगल करण्याची मोहिम भाजपने घेतली आहे,"असे पवार यांनी सांगितले.

आघाडी एकत्र लढणार

शरद पवार म्हणाले, "येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढण्यासाठी पावलं उचलणार आहे. महाराष्ट्रापुरते तरी महाविकास आघाडी एकत्र लढू शकते,"

कोश्यारीनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय पक्षांसह, काही संघटना, विविध मान्यवर व्यक्ती आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे यांनीही नाराजी व्यक्ती केली आहे. राज्यपालांच्या राजीनाम्यांची मागणी करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT