vijay nahata | sharad pawar | ganesh Naik sarkarnama
मुंबई

Ncp Sharad Pawar News : गणेश नाईक अन् विजय नाहटांना पक्षात घ्या, पण...; शरद पवारांच्या ‘NCP’तील कार्यकर्त्यांची ‘वॉर्निंग’

Belapur And Airoli Assembly Election 2024 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनी उमेदवारी मागितली आहे. तर, दोन्ही जागा भाजपकडे जात असल्यानं विजय नाहटा नाराज आहेत.

Akshay Sabale

Navi Mumbai News: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवी मुंबईतील बडे प्रस्थ असलेले आमदार गणेश नाईक ‘तुतारी’ हाती घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील नेते, विजय नाहटा हे सुद्धा ‘तुतारी’ फुंकण्याची चर्चा रंगली आहे. उमेदवारीसाठी हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) मार्गावर असल्याचं बोललं जात आहे. मात्र, दोन्ही नेत्यांना प्रवेश द्या, पण उमेदवारी नको, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचे तिकिट न मिळाल्यास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ‘तुतारी’ हाती घेण्याची तयारी गणेश नाईक यांनी केल्याचं समजते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या माजी नगरसेवकांची मते जाणून घेतली.

दुसरीकडे ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघावर भाजपनं दावा केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेला नवी मुंबईतील एकही जागा सुटत नाही. त्यामुळे शिंदे गटातील नेते, विजय नाहटा हेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर आहेत.

दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा असतानाच नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी गणेश नाईक आणि विजय नाहटा यांच्या उमेदवारीला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. पक्षात प्रवेश द्या मात्र उमेदवारी नको. उमेदवारी दिली, तर निवडणुकीत काम करणार नाही, असा इशारा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT