Sharad Pawar politics: शरद पवारांचा भुजबळांच्या विरुद्ध मोठा डाव; शिवसेनेचा उमेदवार घेणार तुतारी!

Sharad Pawar strategy against Bhujbal: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवार शिवसेनेचा, चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसचे
Kunal Darade, Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Kunal Darade, Sharad Pawar & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News: मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघात उमेदवार कोण? हा अत्यंत जटिल प्रश्न होता. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तोडगा काढला आहे. त्यामुळे भुजबळ यांची निवडणुक आता सोपी राहिलेली नाही.

वारंवार ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आव्हान देणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरी करणारे छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवार ठरला आहे. आज या संदर्भात मुंबईत झालेल्या चर्चेत येवला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आला आहे, असे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने या मतदारसंघावरील आपला दावा मागे घेतला आहे. येवला मतदार संघातून लासलगाव परिसरातील 46 गावांमध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात मोठे वातावरण आहे. या गावांमध्ये मंत्री भुजबळ यांच्या दौऱ्यात जागोजागी विरोध झाला होता.

या भागातून शिवसेनेचे माजी उपसभापती शिवा सुरवसे, माजी आमदार कल्याणराव पाटील, कुणाल दराडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयदत्त होळकर, श्रीमती सोनिया होळकर, माणिकराव शिंदे, गोरख पवार, सचिन आहेर आदी इच्छुक उमेदवार होते.

Kunal Darade, Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Eknath Khadse Politics: मुक्ताईनगर मतदारसंघासाठी भाजप आक्रमक, शिंदे गटाची केली कोंडी!

या सर्व उमेदवारांमध्ये एकमत निर्माण करण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. मात्र त्यात यश आले नव्हते. यासंदर्भात गेल्या महिन्यात सर्व उमेदवारांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चर्चेला बोलावले होते. यावेळी सर्व उमेदवारांची व्यक्तीशः तसेच एकत्रितपणे चर्चा झाली.

सुमारे चार तास येवला मतदारसंघातील राजकारणावर मंथन झाले. मात्र त्यातून एकमत झाले नव्हते. यावेळी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार यांना देण्यात आले होते. या संदर्भात काल रात्री पुन्हा एकदा मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात चर्चा झाली.

त्यानंतर छगन भुजबळ यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याचे ठरले. त्यानुसार आता हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे असेल. या पक्षाकडून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

Kunal Darade, Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Dr Rahul Aher Politics: आमदार राहुल आहेर समर्थक नाराज, आज फडणवीस यांना भेटणार.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आता छगन भुजबळ विरुद्ध कुणाल दराडे अशी लढत होईल, असे स्पष्ट झाले आहे. या निमित्ताने भुजबळ यांच्या विरूद्ध ओबीसी दराडे अशी मोठी खेळी शरद पवार यांनी केली आहे. मंत्री भुजबळ यांना ओबीसी नेताच आव्हान देत आहे.

दराडे आणि भुजबळ कुटुंबीयांत टोकाचा राजकीय संघर्ष आहे. मंत्री भुजबळ यांनी सातत्याने दराडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. आता दराडे हे देखील ओबीसी उमेदवार आहेत. यानिमित्ताने मनोज जरांगे फॅक्टर देखील दराडो यांच्या मदतीला येईल.

भुजबळ यांच्या विरुद्ध अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टाकलेला हा डाव छगन भुजबळ यांना या निवडणुकीत येवला मतदारसंघातच अडकवून ठेवत दमछाक करतो की, निवडणूक सोपी करतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com